Agricultural Advice | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक 22 ते 26 जुलै दरम्यान आकाश मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 22 व 23 जुलै रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. 24,
25 व 26 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. चला तर मग हवामान आधारीत कृषी सल्ला (Agricultural Advice) जाणून घेऊयात.
कपाशी
पिक क्षेत्रात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा
करावा. पिक उगवणीनंतर तन व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक
सोडियम 10% ईसी 12.5 मिली ते 15 मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल 5 % ईसी 15 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. पिक उगवणीनंतर रुंद व अरुंद पानाच्या तन व्यवस्थापनासाठी पायरिथिओबॅक सोडियम 6 % ईसी + क्विझालोफॉप इथाइल 4% ईसी 20 ते 25 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. डवरणी आणि खुरपनीची कामे शक्यतो सकाळच्या वेळी करावी. प्रभावी तन व्यवस्थापनासाठी तन 2 ते 3 पानावर असताना तन नाशकाचा वापर करावा.
सोयाबीन
सोयाबीन पिकामध्ये तणनाशकांच्या फवारणीसाठी पॉवर स्प्रेअरद्वारे फवारणी करत असल्यास 125 लिटर पाणी प्रती हेक्टर तर नॅपसॅक स्प्रेअर द्वारे फवारणी करत असल्यास 450 लिटर पाणी प्रती हेक्टर या प्रमाणात पुरेसे पाणी वापरावे. तणनाशके वापरताना फ्लड जेट/फ्लॅट फॅन नोजल वापरण्याची शिफारस केली जाते. मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात. पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
तूर
मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार
नाही. यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
मुग
मुग पिकाची सलग पीक म्हणून पेरणी टाळावी. मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा
अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा
निचरा करावा.
उडीद
उडीद पिकाची सलग पीक म्हणून पेरणी टाळावी. मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील
पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त
पाण्याचा निचरा करावा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- Ajit Pawar | बिग ब्रेकींग! पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; घरात पाणी शिरलेल्यांना 10 हजार तर दुकानवाल्यांना…
- RBI | रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई! महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द, आता तुमच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
Web Title : Farmers take care of soybeans and cotton according to the rain forecast; Get quick weather-based agriculture advice