ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Loan waiver | राज्य शासनाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांची पिक कर्जे होणार माफ; ‘इतक्या’ कोटींचा निधी वितरणास मान्यता, जाणून घ्या तुम्हाला मिळणार का कर्जमाफी?

Loan waiver | राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट, 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकन्यांचे पीक कर्ज (Loan waiver) माफ करण्यात येणार आहे. यासाठी योजनेअंतर्गत आतापर्यंत 52,512.00 लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी र 50 लाख इतका निधी उपलब्ध आहे. त्याअनुषंगाने सहकार आयुक्त, पुणे यांनी 23.06.2023 च्या पत्रान्वये सदर योजनेसाठी 50 लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत आता निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: Ajit Pawar | बिग ब्रेकींग! पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; घरात पाणी शिरलेल्यांना 10 हजार तर दुकानवाल्यांना…

शासन निर्णय

सन 2023-24 या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. 50.00 लाख एवढा निधी राज्यात जुलै, 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य 33 अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची होणारं कर्जमाफ

सदर खर्च मागणी इतर कृषीविषयक कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून करण्यात येणार आहे. याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्यासह सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त उपनिबंधक अंदाज व नियोजना, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big decision of the state government! Crop loans of farmers will be waived; Approval of fund distribution of ‘so many’ crores, know whether you will get loan waiver?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button