ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Maharashtra Rain | पावसाबाबत मोठी अपडेट! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांना रेड अलर्ट, शेतकऱ्यांनो जाणूनच करा कामाचं नियोजन

Maharashtra Rain | राज्यात जुलै महिन्यापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली असून जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर सातत्याने जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस (Maharashtra Rain update) पडला आहे तर अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी नद्या ओसंडून वाहत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच, हवामान विभागाने रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाच व्यक्त केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आले आहे.

वाचा:  शेतकऱ्यांनो पावासाच्या अंदाजानुसार घ्या सोयाबिन अन् कपाशीची काळजी; त्वरीत जाणून घ्या हवामानावर आधारीत कृषि सल्ला

राज्यात मुसळधार पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जोरदार पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झाला असून मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस सातत्याने बरसत आहे. रायगड जिल्ह्यात मुसाधर पावसामुळे येथील नद्यांना पुर येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, रायगड जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आता सज्ज झाली आहे.

वाचा: तुम्हालाही कमी वेळात व्हायचंय करोडपती? तर ‘या’ पिकाची करा लागवड; पानांपासून मुळ्यांपर्यंत बाजारात विकलं जातंय चढ्या भावात

रेड अलर्ट जारी

दरम्यान, मुंबई शहरात हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यामुळे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात यंदा 5 टक्के पाऊस जास्त पडला आहे. राज्यात 1 जून ते 25 जुलै या कालावधीमध्ये सरासरी 469.0 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र, यंदा 501.3 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आजच्या हवामानाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी शेतीची कामे करावीत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big update on rain! Warning of heavy rain in the state; Red alert has been issued for these areas, farmers should know and plan their agricultural work

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button