ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Pm Kisan 14th Installment | बिग ब्रेकींग! पीएम किसानचा 14वा हप्ता 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, ‘अशा’पद्धतीने तपासा तुम्हाला मिळाला का?

Pm Kisan 14th Installment | पीएम किसान निधीच्या 14व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधून पीएम किसान निधीचा 14 वा हप्ता जारी केला. किसान सन्मान निधीचे 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत. 9 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. 9 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये पीएम किसान (Pm Kisan 14th Installment ) योजनेचा 13 वा हप्ता जारी करण्यात आला होता.

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली

शेतकरी 14 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते, तो आता संपला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता म्हणून 2000 रुपये पाठवले आहेत. परंतु जर तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेबाबत कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर तुम्ही शेतकरी अधिकृत ईमेल आयडी [email protected] वर संपर्क साधू शकता. याशिवाय पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक- 1155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

वाचा:  शेतकऱ्यांनो पावासाच्या अंदाजानुसार घ्या सोयाबिन अन् कपाशीची काळजी; त्वरीत जाणून घ्या हवामानावर आधारीत कृषि सल्ला

याप्रमाणे यादी तपासा

  • पीएम किसान वेबसाइटवर जा.
  • लाभार्थी यादीवर क्लिक करा.
  • राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव यासारखे तपशील प्रविष्ट करा आणि अहवाल मिळवा वर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल. येथे तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

वाचा: तुम्हालाही कमी वेळात व्हायचंय करोडपती? तर ‘या’ पिकाची करा लागवड; पानांपासून मुळ्यांपर्यंत बाजारात विकलं जातंय चढ्या भावात

‘अशा’प्रकारे तपासा हप्ता मिळाला का?

  • 14 वा हप्ता जारी झाला आहे आणि तो तुमच्या बँक खात्यात पोहोचला आहे. अशा स्थितीत तुम्हाला बँकेकडून हप्त्याचा मेसेज आला असेल. याशिवाय लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरही शासनाकडून हप्ता सोडल्याचा संदेश पाठविण्यात आला आहे.
  • जर तुम्ही काही कारणाने मेसेज चेक करू शकत नसाल, तर तुमच्या खात्यात 14वा हप्ता आला आहे की नाही हे तुम्ही जवळच्या एटीएम मशीनमधून तुमची शिल्लक किंवा मिनी स्टेटमेंट काढून जाणून घेऊ शकता.
  • जर तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन तुमच्या पासबुकमध्ये नोंद करून घेऊ शकता.
  • तसेच तुमच्याकडे बँकेचा मिस कॉल नंबर असेल. यावर मिस कॉल देऊन तुम्ही तुमची एकूण शिल्लक जाणून घेऊ शकता. अशा परिस्थितीत, तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळाले आहेत की नाही हे कळू शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! 14th installment of PM Kisan deposited in 9 crore farmers’ accounts, check ‘like this’ method did you get it?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button