ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Cotton Price | येत्या काळात कापसाच्या दर वाढणार! आता कापसाच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची वाढ; जाणून घ्या दरवाढीचं संपूर्ण गणित

Cotton prices will increase in the coming time! Now the price of cotton has increased by 'so much' rupees; Know the complete math of price hike

Cotton Price | कापसाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये सुरू असलेली सुधारणा कायम राहण्याची शक्यता आहे. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक आणि विक्री वाढत असल्याने आणि जिनिंगची धडधड सुरु होत असल्याचा परिणाम बाजारावर दिसला आहे. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढत असून, सरासरी दैनंदिन आवक ७० हजार क्विंटलच्या वर पोहोचली आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे.

जिनिंगचीही धडधड सुरु होत असून, दररोज २५ हजार ते ३० हजार क्विंटल कापसाची जिनिंग होत आहे. यामुळे कापसाची मागणी वाढत आहे. या सर्व घटकांमुळे कापसाच्या भावात सुधारणा होण्याचा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मते, पुढील महिनाभरात कापसाच्या भावात ५०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते.

  • कापसाच्या भावात सुधारणा होण्याची कारणे?
  • देशातील कापूस उत्पादनात घट
  • जागतिक बाजारात कापसाच्या भावात वाढ
  • कापसाची मागणी वाढणे
  • जिनिंगची धडधड वाढणे.

वाचा : Onion Rate | काय आहेत आजचे कांद्याचे बाजारभाव ; जाणून घ्या सविस्तर एका क्लिकवर…

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी कापसाच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी कापूस बाजाराकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल. कापूस बाजारातील घडामोडींचा अभ्यास करूनच मालाची विक्री करावी.

हेही वाचा :

Web Title: Cotton prices will increase in the coming time! Now the price of cotton has increased by ‘so much’ rupees; Know the complete math of price hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button