ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | शेतकऱ्यांनो सावधान! दक्षिण महाराष्ट्रात उद्यापासून जोरदार होणार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांत वीज वाऱ्यांचा कडकडाट

Farmers beware! South Maharashtra will receive heavy rain from tomorrow; Lightning strikes in these districts

Weather Update | राज्यात थंडी कमी होत असून, कमाल तापमानात वाढ होत आहे. यातच पावसला पोषक हवामान होत असून, उद्यापासून (ता. 23) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Update) दिली आहे. भारताच्या दक्षिणेकडील कोमोरीन भागापासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा (Today’s Weather Update) कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कोमोरिन भागावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती तसेच तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती वरील कमी दाबाच्या पट्ट्यात विरून गेली आहे.

यातच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरूवारी (ता. 23) सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची, तर सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. 21) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे देशातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सांताक्रुझ येथे कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पार आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

वाचा : Weather Update | शेतकऱ्यांनो राज्यात अवकाळी पावसाचा इशारा! 26 नोव्हेंबरपर्यंत ‘या’ भागांत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटसह जोरदार पाऊस

किमान तापमानातही चढ-उतार सुरूच असून, गारठा कमी झाला आहे. मंगळवारी (ता. 21) जळगाव येथे राज्यातील नीचांकी १४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

  • महाराष्ट्रात आजचे हवामान
  • पुणे : ३१.५ (१७.४)
  • जळगाव : ३२.५ (१४.९)
  • कोल्हापूर : ३०.५ (१९.८)
  • महाबळेश्वर : २६.१ (१५.९)
  • नाशिक : ३१.७ (१६.८)
  • निफाड : ३०.८ (१५.४)
  • सांगली : ३१.० (१८.८)
  • सातारा : ३१.६ (१८.०)
  • सोलापूर : ३४.०(१८.४)
  • सांताक्रूझ : ३६.५(२४.२)
  • डहाणू : ३६.६ (२२.६)
  • रत्नागिरी : ३५.० (२२.४)
  • हवामान विभागाचा अंदाज

उद्या (ता. 23) सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा :

Web Title: Farmers beware! South Maharashtra will receive heavy rain from tomorrow; Lightning strikes in these districts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button