ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Viral Video | चर्चा तर होणारचं ना राव! गुढीपाडव्याला शेतकऱ्यानं थेट लाडक्या बोकडाचं घातलं बारसं, पाहा व्हिडिओ

Viral Video | शेतकऱ्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बोकडाचे बारसं घातला आहे. ज्याचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video | साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याला भारतीय सणांमध्ये प्रचंड महत्व दिले जाते. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक शुभ कार्य केले जातात. नवीन वस्तू खरेदी असो किंवा एखादा कार्यक्रम. तसेच गुढीपाडव्या दिवशी लहान मुलांचे नामकरण (Viral Video) देखील केले जाते. नुकतीच एक आगळी वेगळी आणि चकित करणारी बातमी समोर आली आहे. आपण एखादा प्राणी पाळला की, त्यावर किती जीव बसतो हे सांगायची गरजच नाही. त्यातली त्यात शेतकऱ्यांची गोष्ट तर निराळीच. एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या बोकडाचं (Viral Video) थेट बारस घातला आहे. ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

शेतकऱ्यानं बोकडाच घातलं बारसं
बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या बोकडाचा सांभाळ अगदी आपल्या मुलाप्रमाणे केला आहे. त्याचं बोकड त्याच्यासाठी प्रिय असल्यामुळे तो त्याचे अनेक लाड पुरवतो. आता तर या शेतकऱ्याने आपल्या लाडक्या बोकडाचं थेट बारसचं घातलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे या शेतकऱ्याची आणि बोकडाची विशेष चर्चा केली जात आहे.

तब्बल 70 हजारांचे बोकड केलं घरेदी
तर बीड जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी गावचे विठ्ठल डीसले या शेतकऱ्याने बोकडाचं बारसं घातलं आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय ते केवळ पैशांसाठी नाही तर एक आवड म्हणूनही करतात. तर या शेतकऱ्याने नऊ महिन्यांचा बीटल जातीचा बोकड तब्बल 70 हजार रुपयांना खरेदी केला आहे. त्याच्यावर या शेतकऱ्याचा अमाप बसला आहे, म्हणूनच त्याच थेट गुढीपाडव्यानिमित्त या शेतकऱ्यांना बारसचं घातलं आहे.

शेतकऱ्याचा लाडकं बोकड
या शेतकऱ्याने त्याच्या लाडक्या बोकडाचे नाव ‘चेतक’ असं ठेवलं आहे. नामकरण सोहळ्यासाठी शेजारीपाजारी आले होते. त्यावेळी बोकडाला पुष्पहार, पायात तोडे आणि गळ्यात पितळाची साखळी घालून त्याला सजवून त्याच थाटात बारासं घातलं आहे. आजतागायत कोणीही बोकडाचं बारसं पाहिलं नसावं, पण तो शेतकरी आहे जो आपल्या गुरांवर देखील जीवापाड प्रेम करतो. आपली मुलं काय आणि गोरख आहे समानच असतात. काळ्या आईवर प्रेम करणारा शेतकरीचं हे शकतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: There will be no discussion Rao! In Gudipadwa, the farmer directly killed the beloved buck, watch the video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button