ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Incentive Subsidy | कर्जमुक्ती योजनेच्या चार याद्या प्रकाशित! मग उर्वरित शेतकऱ्यांचं काय होणार? जाणून घ्या मिळणार का लाभ….

Incentive Subsidy | राज्यात नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत 50 हजारांचे अनुदान (Incentive Subsidy) देण्यात येत आहे. याची राज्यात अंमलबजावणी सुरू आहेत. या योजनेच्या चार याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये काही गावे आणि शेतकरी पात्र असून देखील त्यांची नावे आले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या (Incentive Subsidy) मनात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. या योजनेची नवी यादी प्रकाशित होईल का? आणि त्या शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन अनुदान मिळेल का? ही माहिती जाणून घेऊया.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

उर्वनी मागण्या सादर
कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी राज्यात तब्बल 4 हजार 700 कोटींची तरतूद करण्यात आली होती. हा सर्व निधी पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत वितरीत करण्यात आला आहे. यामुळे आता शासनाकडे या योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्याने या योजनेची अंमलबजावणी मंद गतीने सुरू होती. याच पार्श्वभूमीवर 27 फेब्रुवारी 2023 रोजी सहकारी विभागाच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पासाठी तेराशे कोटींच्या उर्वणी मागण्या सादर करण्यात आल्या.

तब्बल ‘इतक्या’ कोटींची तरतूद
सहकारी विभागाच्या माध्यमातून केलेल्या उर्वणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. 14 मार्च 2023 रोजी राज्यपालांच्या माध्यमातून अधिसूचना जारी करून या उर्वणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली. तर याच तेराशे कोटी 34 लाख 96 हजार उर्वनी मागण्यासाठी विवरण पत्र 17 मार्च रोजी सादर करण्यात आले. यामध्ये प्रोत्साहन अनुदानासाठी तब्बल 1 हजार 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

पात्र शेतकऱ्यांचं काय होणार?
या उर्वणी मागण्यांमध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी तब्बल 1 हजार 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमध्ये उर्वरित जे शेतकरी पात्र होतील त्यांच्या याद्या प्रकाशित करून त्यांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे. कारण पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पुन्हा प्रकाशित होणार आहेत, तसेच त्यांना लाभही मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Four lists of debt relief scheme published! Then what will happen to the rest of the farmers? Know why you will get benefits

One Comment

  1. देवेंद्र फडणवीस ठाकरे उधव तसेच आता एकनाथ शिंदे तिन्ही मुख्यमंत्री हवेत गोळीबार करत कर्ज मुक्ती योजना राबविली परंतु कोणीही योजना त्रुटी दूर n करता ठराविक शेतकरी पात्र करून सरसकट कर्ज माफी चे वाचन पाळले नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button