ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Walmart Foundation |देशातील शेतकऱ्यांचं बदलणार नशीब! शेतकऱ्यांसाठी ‘या’ नव्या योजनेची घोषणा, जाणून घ्या सविस्तर

Walmart Foundation |बुधवारी झालेल्या वॉलमार्ट (Walmart Foundation) फाउंडेशनच्या बैठकीत त्यांनी आपली पाच वर्षांची नवीन रणनीती जाहीर (anounce) केली आहे आणि त्यात त्यांनी भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी पुढाकार घेत 2028 पर्यंत 10 लाख अल्पभूधारक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे, तसेच यात किमान 50% टक्के तरी महिला (Womens) असतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या योजने अंतर्गत उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशा यासह अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने तसेच शेती एकत्रीकरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ना-नफा संस्थांना देखील अनुदान दिले जाईल असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले आहे.

यावेळी असे देखील सांगण्यात आले आहे की वॉलमार्ट फाऊंडेशनचे (Walmart)स्थानिक अनुदानधारकांना शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) च्या क्षमता वाढीसाठी मदती करता सक्षम करेल, त्यासाठी महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासोबतच आता शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेतील संबंध वाढवणे तसेच पर्यावरणपूरक कृषी (Krishi)पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे शक्य होईल. जेणकरून त्यांना शेती या व्यवसायात त्यांना व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.

वॉलमार्ट फाउंडेशने केले नवीन अनुदान जाहीर

वॉलमार्ट (walmart)फाऊंडेशनच्या नवीन पंचवार्षिक धोरणानुसार दोन नवीन अनुदानांची घोषणा करण्यात आली, ज्यात महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी टेक्नोसर्व्हला $3 दशलक्ष अनुदानाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच 24 एफपीओ आणि 30,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे देखील उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे, त्यापैकी 50% ह्या महिला असतील असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच ट्रिकल अपला $533,876 अनुदान, ज्याचे उद्दिष्ट असे आहे की ओडिशातील 1,000 अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे व त्यांना तेथील दोन FPOs शी जोडणे हे आहे. तसेच वॉलमार्ट फाऊंडेशनने $25 दशलक्ष गुंतवणुकीचे उद्दिष्ट पार करून, आता 16 अनुदानितांसह 24 अनुदान उपक्रमाव्दारे भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या अनुदानांमध्ये $39 दशलक्षहून अधिक निधी उभारण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्याचप्रमाणे हे अनुदान आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, झारखंड , पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये देण्यात आले आहे.

आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार मोठा आधार

वॉलमार्ट (Walmart)फाउंडेशनच्या या नवीन अनुदानात गुंतवणुक केल्यास, अनुदानधारक हे 800,000 पेक्षा जास्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकत्रितपणे मदत करतील. तसेच मदत मिळणाऱ्या शेतकऱ्यांन मध्ये 50% ह्या महिला शेतकरी असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच वॉलमार्ट फाउंडेशनचे हे अनुदान नवीन वर्षाच्या अखेरीपासून करण्यात येणार आहे. या योजनेसाठी भारतातील संबोधी या कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार तसेच त्यावरून आलेल्या निकषांना आधार दिला जाईल. तसेच या अभ्यासात विविध अनुदानित स्वयंसेवी संस्थांनी एफपीओ क्षमता वाढीसाठी घेतलेल्या विविध उपक्रमांचे विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच या अभ्यासात असे दिसून आले आहे की या उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात एफपीओ स्तरावर प्रणाली आणि प्रक्रिया ह्या बळकट झाल्या असून, याद्वारे कंपन्यांचा महसूल आणि नफा देखील वाढला आहे, त्यामुळे महिलांचे नेतृत्वात हे कृषी(Krishi) स्तरावर वाढण्यास फार मोठी मदत झाली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Walmart Foundation comes up with a new plan for farmers; So let’s find out what this plan is all about !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button