ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

Success Story | नोकरी सोडून सुरू केला दुगधव्यवसाय! आता कमावतो महिन्याला १० लाख…

Success Story|कोरोनानंतरच्या काळात बहुतेक तरुण नोकरी सोडून शेती व्यवसायाकडे वळले आहेत. नवनवीन कल्पनांमधून स्वतःचे व्यवसाय उभे करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे नोकरीपेक्षा कित्येक पटींनी जास्त पैसे त्यांना व्यवसायातून मिळत आहेत. यामध्ये कमी वयाच्या तरुणांचा सुदधा समावेश आहे.

नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय

कर्नाटक मधील एका इंजिनिअर तरुणाने आपली चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून गावी आपला व्यवसाय सुरू केला. नोकरी सोडल्यानंतर त्याने स्वतःचा दुगधव्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवल खर्च करून १३० गायी खरेदी केल्या. तसेच व्यवसाय मोठा करण्यासाठी १० एकर जमीन खरेदी केली.

२६ व्या वर्षी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवले.

जयगुरु आचार हिंडर असे या तरुणाचे नाव आहे. त्याने वयाच्या २६ व्या वर्षी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवले. मात्र या व्यवसायात त्याला काहीतरी नवेपन हवे होते. एकदा युट्युबवर व्हिडीओ ( Youtube Video) पाहत असताना त्याला शेणापासून व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्याने शेणखत विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

शेणखत विक्री

शेणखताला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे ओळखून जयगुरुने शेण साठवायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने शेण वाळवून भुगा करणारी एक मशीन विकत घेतली. असे करून तो महिन्याला शेणखताची 100 पोती विकतो. तसेच गोठा धुण्यासाठी वापरलेले पाणी वाया न जाऊ देता जयगुरु ते साठवून ठेवतो. नंतर हे पाणी सुद्धा तो खत म्हणून विकतो.

महिन्याला कमावतो १० लाख

जयगुरु प्रत्येक दिवशी ७५० लिटर दूध आणि महिन्याला ३० ते ४० लिटर तूपाची विक्री करतो. यातून त्याला महिन्याला १० लाख रुपये मिळतात. जयगुरुने आपल्या व्यवसायासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology ) वापरले आहे. भविष्यात दुधापासून उत्पादने बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्याची जयगुरुची इच्छा आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Success story of young engineer who started dairy farming

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button