ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

Dairy Business | दुष्काळाशी लढा देत यशस्वी झाले दांपत्य! ४५ गायींचा गोठा आणि दररोज ४०० लिटर दूध उत्पादन, वाचा यशोगाथा

Dairy Business | दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील बेवणूर गावातील दगडू मच्छिंद्र लोखंडे आणि त्यांची पत्नी शांता यांनी अथक मेहनतीने आणि कुशल व्यवस्थापनाने ४५ गायींचा यशस्वी गोठा उभारला आहे. दररोज ४०० लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन करणारे हे दांपत्य गावातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

दुष्काळाशी लढा आणि शिक्षणाची ओळख:
दगडू यांच्या वडिलांकडे पाच एकर शेती होती, पण ती पावसावर अवलंबून होती. दुष्काळामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाला. दहा वर्षे मेंढीपालन करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि २००३ मध्ये सांगली शहरात चार वर्षे नोकरी केली.

दुग्ध व्यवसायात यशस्वी प्रवेश:
नोकरीतून समाधान मिळत नसल्यामुळे त्यांनी २००३-०४ मध्ये दोन एचएफ संकरित गायी खरेदी करून दुग्ध व्यवसायात प्रवेश केला. सांगोला, सांगली आणि कोल्हापूर मधील गोठ्यांना भेटी देऊन त्यांनी व्यवसायाची बारकावे आणि तंत्रज्ञान शिकले.

वाचा |Business | आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार गायी-म्हशी! थेट लाखोंची नोकरी सोडून तरुणांनी नादखुळा व्यवसाय केला सुरू

अविरत कष्ट आणि उत्तम व्यवस्थापन:
पहाटेपासून रात्रीपर्यंत कष्ट, कुशल व्यवस्थापन, उत्तम आर्थिक नियोजन आणि व्यवसाय वृद्धीची इच्छाशक्ती यांच्या बळावर दगडू यांनी हळूहळू प्रगती केली. वीस वर्षांत त्यांनी दोन गायींपासून ४५ गायींचा गोठा उभारला.

  • गोठ्याची वैशिष्ट्ये
  • चारा व्यवस्थापन: तीन एकरांवर चारा पिके. पाण्याची टंचाई असल्यामुळे मुरघास निर्मितीचे यंत्र खरेदी करून मका आणि इतर चारा पदार्थ तयार केले जातात.
  • गायींची संख्या मर्यादित: घरच्या दोन व्यक्ती व्यवस्थापन करू शकतील या पद्धतीने गायींची संख्या मर्यादित ठेवली जाते.
  • आधुनिक सुविधा: ११० बाय १०० फूट मुक्तसंचार गोठा, स्वतंत्र चार कप्पे, टॅगिंग, यांत्रिक दूध काढणी, नियमित निर्जंतुकीकरण.
  • उत्पादन आणि उत्पन्न: दररोज ४०० लिटर दूध उत्पादन, २८ रुपये प्रति लिटर दर, ३० ते ४० टक्के नफा.
  • अतिरिक्त उत्पन्न: शेणखताची विक्री ५ हजार रुपये प्रति ट्रेलर.

Web Title | Dairy Business | The couple was successful in fighting the drought! A stable of 45 cows and 400 liter milk production per day, read the success story

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button