ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

Animal Husbandry | उन्हामुळे जनावरांची होरपळ पाहवेणा, शेतकऱ्याच्या मुलाने बनवला थेट ‘असा’ वातानुकूलित गोठा

आपल्या सर्वांना माहित आहे की, आजकाल मोबाईल लोकांसाठी प्रत्येक गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाचा बनला आहे. मोठ्यांपासून ते अगदी लहान मुले मोबाईल (Mobile)फोनशिवाय जगू शकत नाहीत.

Animal Husbandry | मोबाईल फोन कोणाच्याही हातातून काढून काही काळ दूर ठेवल्यास तो अस्वस्थ आणि बैचेन होतो. मात्र, याच मोबाईल फोनचा वापर करून 16 वर्षीय मुलाने शेतात (Agriculture) एक अनोखा प्रयोग (Experiment) केला आहे. मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील शुभम साळुंखे या मुलाने आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी वातानुकूलित पंखे (Air conditioned fan) आणि फॉगरच्या (Fogger) मदतीने पाण्याची फवारणी करीत जनावरांचा गोठा थंड करण्याचा प्रकल्प यशस्वी केला आहे. शेतकरी शिवाजी साळुंखे हे आपल्या भावाच्या शेतामध्ये मुक्त गोठा प्रकल्प सुरू केला आहे. या मुक्त गोठा प्रकल्पामध्ये त्यांनी जर्शी जनावरांचे पालन सुरू केले आहे.

वाढत्या तापमानाचा जनावरांना त्रास
सध्या, उन्हाळा तीव्र असल्यामुळे त्याचा जनावरांना त्रास होत असून उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता, तसेच म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर आणि प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होत आहे. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जर जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील, तर त्याच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो.

वाचा: शेळी पालनासाठी शेळ्यांची निवड कशी करावी व शेळी पालनाचे व्यवस्थापन कसे करावे…

असा’ केला प्रयोग
वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढत असून, परिणामी जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होत आहे आणि पाणी पिण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या दुधात घट होत असून, वाढत्या उष्णतेमुळे जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत आहे. दरम्यान, या समस्येवर विचार करत शुभम साळुंखे मोबाईलच्या माध्यमातून जनावरांची कशी काळजी घ्यावी? यासंबंधी माहिती पाहत असताना शुभम साळुंखे याला आवश्यक असलेली माहिती यूट्यूबद्वारे मिळाली. यानंतर, त्याने शेतात उपलब्ध असलेल्या ड्रीपचे पाइप, बॅटरीवर चालणारा पंप, घरात उपलब्ध असणारे पंखे व पाच फॉगर ऑनलाइन मागवले आणि हा प्रयोग यशस्वी केला आहे.

नेमकं काय आहे हा प्रयोग?
थंडगार गोठा तयार करण्यासाठी 20 लीटर पाणी बसणाऱ्या पंपामध्ये पाणी ओतून हे फॉगर चालू केले. विजेवरती चालणारे तीन पंखे सुरू केल्यानंतर हा बॅटरी पंप चालू करून ड्रीपच्या पाइपमधून हे पाणी सर्वत्र जाऊन तुषार सिंचनाप्रमाने पाण्याचे बारीक कन उडून गोठ्यामध्ये थंड वाऱ्याची झुळूक निर्माण होते. यामुळे जनावरांच्या अंगावर पाण्याचे छोटे थेंब पडून सभोवतालच्या वातावरणात गारवा निर्माण होतो.

वाचा: Animal husbandry | डांगी गाई शेतकऱ्यांसाठी आहे खूपच उपयुक्त, जाणून घ्या निसर्गातील स्थान आणि वैशिष्ट्य

किती आला खर्च?
दरम्यान, या प्रयोगासाठी 2000 रुपयांचा खर्च आला असल्याचे शुभम याने सांगितले आहे. तसेच, 15 जर्सी गाई पासून दररोज 10 ते 120 लीटर दूध मिळत असल्याचे साळुंखे यांनी सांगितले आहे. लहान वयातच हा प्रयोग करून चांगले उत्पन्न मिळवणाऱ्या शुभम याचे कौतुक परिसरातील व्यक्ती करत आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button