ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Jio Recharge | जिओची कमी पैशात धमाल ऑफर ! ‘हे’ आहेत जिओचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स

Jio Recharge |जिओ आणि एअरटेल ( Jio & Airtel) या देशातील आघाडीच्या मोबाईल नेटवर्क कंपन्या आहेत. यामध्ये जिओ ही स्वस्तात मस्त डाटा सेवा पुरवणारी नेटवर्क कंपनी म्हणून ओळखली जाते. खूप कमी कालावधी मध्ये जिओ कंपनीने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. देशात जिओचे करोडो ग्राहक आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे जिओच्या (Jio) वाढत्या ग्राहकांच्या संख्येमुळे कितीतरी मोठ्या-मोठ्या नेटवर्क कंपन्यांना कंपनीला टाळे लावावे लागले आहे. खरंतर जिओचे ग्राहक वाढण्यामागचे मोठे कारण म्हणजे जिओचे डाटा प्लॅन्स ! जिओ कमी पैशात जास्त सेवा देते. जिओचे प्लॅन्स लोकांना आकर्षित करणारे व विशेषतः परवडणारे आहेत.

आज जाणून घेऊयात जिओच्या स्वस्तात मस्त धमाकेदार प्लॅन्स बद्दल …

1) जिओ ८९५ रिचार्ज प्लॅन

हा प्लॅन ३३६ दिवसांचा आहेत. यामध्ये तुम्हाला २८ दिवस चालणारे १२ सायकल प्लॅन मिळतात. यामध्ये २४ GB डेटा दिला जातो. म्हणजेच २८ दिवसासाठी २ जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. तसेच २८ दिवस SMS सेवा उपलब्ध आहे.

2) जिओ २२२ रिचार्ज प्लॅन

हा प्लॅन २८ दिवसांचा आहे. यामध्ये ५६ जीबी डेटा दिला जातो. म्हणजे रोज २ GB डेटा मिळतो . हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग सह असून यामध्ये रोज १०० एसएमएस करता येतात. तसेच Jio TV, Jio Cinema, Jio Security चे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते.

3) जिओ १५२ रिचार्ज प्लॅन

या रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच 24 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये 300 एसएमएस
करता येतात. ज्या वापरकर्त्यांना कमी किंमतीत जास्त फायदे हवे आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन किफायतशीर आहे. जिओचा सर्वात जास्त विकणाऱ्या प्लॅन्सच्या लिस्टमध्ये या प्लॅनचा समावेश आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Benificial jio recharge plans

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button