ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

सुपीक जमिनीसाठी सरकारचा अनोखा फंडा ! आणली गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना; असा करा अर्ज

शेती व शेतकऱ्यांना विकास व्हावा यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असते. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी सरकार विविध योजना व अनुदाने जाहीर करत असते. दरम्यान सरकारने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना जाहीर केली होती. या योजनेमुळे शेतजमिनी सुपीक ( Fertile) होण्यास मदत होणार आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना

शेतजमिनींची सुपीकता वाढवून शेतीचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने राज्य सरकारने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ( Galmukt Dharan Galyukt Shivar ) योजना राबविली आहे. राज्यातील जलसाठ्यांमध्ये सुमारे ४४ कोटी घनमीटर गाळ आहे. हा गाळ काढल्याने जलसाठ्यांची साठवणूक वाढेल व काढलेला गाळ शेतजमिनीसाठी वापरल्याने जमिमीचा पोत सुधारेल.

वाचा: बातमी कामाची ! हुमणीचा बंदोबस्त करण्याचा जालीम उपाय ; जाणून घ्या सविस्तर

गाळ वाहतूक खर्च

यामुळे ही योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. राज्यसरकार कडून ही योजना कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी यंत्रसामग्रीला इंधनासह प्रतिघनमीटर ३१ रुपये ठरविण्यात आला आहे. यामुळे कमी दरात शेतकऱ्यांना धरणातील गाळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती अवनी अँपवर उपलब्ध आहे.

Eligiblity | पात्रता

१) राज्यातील अल्पभूधारक व अत्यल्प शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. अशा शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी एकरी १५ हजरांचे अनुदान देण्यात येणार आहे.
२) आत्महत्याग्रस्त, अपंग, विधवा शेतकरी या योजनेस व अनुदानास पात्र असतील.

Application | असा करा अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाइन व ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपले सरकारच्या जलसंधारण विभागाच्या ऑनलाइन वेबसाईटवर भेट द्या. याठिकाणी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानावर जाऊन अर्ज भरा. तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या तहसीलदार कार्यालयास भेट द्यावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: How to apply for galmukt dharan galyukt shivar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button