ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Sand Transport | वाळू वाहतूक करण्यासाठी ऑनलाइन वाहन नोंदणी सुरू ! या स्टेप्स करा फॉलो …

Sand Transport | राज्यसरकारने काही दिवसांपूर्वी नवे रेती धोरण (New Sand Policy) जाहीर केले होते. या धोरणाअंतर्गत राज्यातील नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये वाळू मिळणार आहे. राज्यात अवैध्य वाळू उपशाला लगाम लागावा व सामान्य नागरिकांना कमी किंमतीत वाळू मिळावी यासाठी सरकारने हे धोरण अवलंबिवले आहे. या नवीन धोरणामुळे इथून पुढे वाळू विक्रीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.

Online registration | ऑनलाइन नोंदणी आवश्यक

वाचा: मोचा चक्रीवादळ तीव्ररुप धारण करणार ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा बसणार मोठा फटका

सर्व नागरिकांना वाळू खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. तसेच राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेली वाळू नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची सुद्धा ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. फक्त ऑनलाइन पद्धतीने नोंदणी झालेल्याच वाहनांमधून वाळूची वाहतूक केली जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी अतिशय आवश्यक आहे.

GPS असेल तरच करा नोंदणी

राज्यातील सर्व इच्छुक वाळू वाहतूक धारकांना वाळू वाहतुकीसाठी महा-खनिज वेबसाईटवर आपल्या वाहनाची नोंदणी करावी लागणार आहे. वाहनांची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तुमच्या वाहनाला GPS असेल तरच वाहन वाळू वाहतुकीसाठी पात्र असणार आहे.

वाळू वाहन वाहतूक नोंदणी

१) सुरुवातीला महाखनिजच्या https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
२) यामध्ये वाळू बुकिंग पर्यायावर क्लिक करा.
३) त्यानंतर वाहतूकदार पर्याय निवडा
४) तेथे महाखनिज ट्रॅक होम चे पेज उघडेल.
५) याठिकाणी आपला युझर आयडी तयार करा.
६) आता साइन अप करा.
७) येथे आपले संपूर्ण नाव, चालू मोबाईल क्रमांक आणि जिल्हा टाका
८) नंतर ‘submit’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येईल. तसेच पासवर्डची लिंक सुद्धा येईल.
९) येथे पासवर्ड सेट करा आणि युझरनेम व तयार केलेला पासवर्ड टाकून लॉगिन करा.
१०) आता ‘नवीन वाहन जोडा’ वर क्लिक करून सगळी माहिती भरा. तसेच गाडीचे फोटो अपलोड करा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Steps for sand transport online registration on mahakhanij

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button