ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Insurance |अरेरे ! योजना जाहीर झाली पण अजून आदेश नाहीच; शेतकरी पीक विमा योजनेच्या प्रतिक्षेत

Crop Insurance | राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मागील काही दिवसांत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने पीक विम्याची (Crop insurance) घोषणा केली आहे.

१ रुपयांत पीक विमा उतरवता येणार

नैसर्गिक आपत्ती व अवेळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या पिकांच्या नुकसानीची पुरेशी भरपाई मिळावी, या उद्देशाने आता शेतकऱ्यांना फक्त १ रुपयांत पीक विमा उतरविता येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget 2023) सरकारने याबाबतची घोषणा केली होती.

शेतकऱ्यांना अजून वाट पहावी लागणार

अगामी खरीप हंगामातील पिकांपासून सर्व शेतकऱ्यांना या पीकविमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. परंतु, या योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा कोणताही आदेश अजूनही कृषी विभागाला ( Agriculture Department) मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या विमा योजनेच्या लाभासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

पंतप्रधान ‘पीक विमा योजना’

शासनाने ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ या नावाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत येत्या खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा फक्त एक रुपयांत उतरविता येणार आहे. परंतु या योजनेसाठी नक्की पात्रता काय आहे, कोणकोणत्या पिकांसाठी या योजनेमध्ये समावेश होतो, विम्याचा हप्ता कोठे व केव्हापासून भरायचा, विम्याची रक्कम किती मिळणार, पिकाचे नुकसान झाल्याची माहिती केव्हा, कधी व कुणाला द्यावी. याबाबतची कुठलीही माहिती अजून प्राप्त झालेली नाही.

म्हणून योजना अजूनही प्रतिक्षेत

या योजनेबाबतच्या मार्गदर्शक सूचना सरकारने अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. यामुळे या योजनेचे निकष, पात्रता, फायदे, याबाबतची सर्व माहिती ही आदेश मिळाल्यानंतरच कळू शकणार आहे. दरम्यान मोचा चक्रीवादळामुळे राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will get crop insurance in only one rupee

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button