ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather News | ब्रेकींग न्युज: यंदाच्या वर्षी पाऊस पडणार कमी ; शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये होणार वाढ

Weather News |पाऊस आणि शेती हे अतिशय महत्त्वाचे समीकरण आहे. पावसामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होते. दरम्यान एकीकडे पाऊस जास्त पडला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते. तर दुसरीकडे पाऊस नाहीच पडला तर पाण्यावाचून पीक जळून जाते. मात्र काहीही झालं तरी पुरेसा पाणी साठा होण्यासाठी पाऊस हा महत्त्वाचा आहेच !

यंदा पावसाचे दिवस कमीच

दरम्यान जागतिक तापमान वाढ ( Globle Warming) , प्रदूषण ( Pollution) व इतर कारणांनी वातावरणात सतत बदल होत आहेत. यावर्षी तर उन्हाळ्याच्या दिवसांत अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच गारपीट सुद्धा होत आहे. मात्र यंदा पावसाळ्यात पावसाचे दिवस कमी असणार आहेत. असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

वाचा: आता स्वतःचा व्यवसाय सुरू करा जोमात ; या योजनेत सहभागी होऊन मिळवा विनातारण ५ कोटींचे कर्ज…

अल निओ राहणार सक्रिय

यावर्षी पावसाळ्यात अल निओ ( Al nio) सक्रिय राहणार आहे. याचा फटका परतीच्या पावसाला बसणार असून पावसाचे दिवस कमी असणार आहेत. खास करून मराठवाड्यात पाऊस कमी प्रमाणात पडणार आहे. मराठवाडा (Marathwada) परतीच्या पावसाचा प्रदेश म्हणून विशेष ओळखला जातो.

म्हणून सध्या वातावरणात होतोय बदल

मात्र यंदा बदललेल्या वतावरणाचा फटका मराठवाड्यातील परतीच्या पावसाला बसणार आहे. तसेच यावर्षी कडक उन्हाचे ( Hot summer) दिवस सुद्धा कमीच असणार आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या कडक ऊन, मध्येच पाऊस आणि ढगाळ वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागच्या दोन वर्षांसारखी यंदा परिस्थिती नसणार

मागील दोन वर्षात मराठवाड्यात भरपूर पाऊस झाला. याठिकाणची धरणे अक्षरशः ओसंडून वाहिली. मात्र यंदा अशी परिस्थिती नसणार आहे. याबाबतची माहिती एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे. तसेच मोचा चक्रीवादळामुळे राज्यात १६ मे पर्यंत कोरडे व रखरखीत ऊन पडणार असल्याचे सुद्धा औंधकर यांनी सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Less rainfall due to al nio in marathwada

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button