ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

WhatsApp Loan | व्हॉटसॲप वर ‘हाय’ पाठवा आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे कर्ज..

WhatsApp Loan | कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हणजे त्यासाठी भांडवल लागते. हे भांडवल मिळवण्यासाठी व्यवसायिक कर्ज (Buisness Loan) घेतात. मात्र बऱ्याचदा कर्ज वेळेत उपलब्ध होत नाही. किंवा कर्ज घेताना फार अडचणी येतात. दरम्यान कर्ज घेणाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. आता कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या बँकेत जावे लागणार नाही. थेट WhatsApp वर १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

१० लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार

IIFL या कंपनीने या संदर्भात नुकतीच घोषणा केली आहे. या कंपनीकडून ग्राहकांना व्यवसाय कर्ज दिले जाईल. IIFL ने आपल्या ग्राहकांना १० लाखांपर्यंतच्या व्यवसाय कर्जासाठी मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्ज पूर्णतः डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार सुरू आहे का ? हे पर्याय ठरू शकतात तुमच्यासाठी स्वस्तात मस्त !

४५० मिलियन वापरकर्ते घेऊ शकतात लाभ

आयआयएफएल फायनान्सचे व्हाट्सएपवरील व्यवसाय कर्ज हा अर्ज उद्योगातील पहिलाच प्रयोग आहे. यामध्ये कर्जाच्या अर्जापासून ते मनी ट्रान्सफरपर्यंत १००% सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने केल्या जाणार आहेत. भारतातील ४५० मिलियनहून अधिक WhatsApp वापरकर्त्यांना हे अर्ज मिळू शकते.

IIFL काय आहे ?

IIFL ही भारतातील सर्वात मोठ्या रिटेल NBFC पैकी एक आहे. यामार्फत अनेक लघु व सूक्ष्म उद्योगांना कर्ज दिले जाते. या कंपनीच्या भारतभर अनेक शाखा असून त्यांच्या डिजिटल सेवा विशेष प्रसिद्ध आहेत. याच कंपनीकडून आता २४x७ एंड-टू-एंड डिजिटल कर्ज सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे.

Process | कर्ज मिळवण्यासाठी प्रक्रिया

दरम्यान WhatsApp सुविधेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. जर तुम्ही कर्जासाठी केलेला अर्ज सर्व तपशीलांशी जुळत असेल तर तुमचे कर्ज मंजूर केले जाईल. हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही ‘9019702184 ‘ या नंबरवर “Hi” पाठवून प्रक्रिया सुरू करू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Get digital bank loan on whatsapp.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button