ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या
ट्रेंडिंग

PM Kisan Scheme| एका कुटुंबातील फक्त ‘एवढ्याच’ व्यक्ती घेऊ शकतात पीएम किसान योजनेचा लाभ, अन्यथा….

PM Kisan Scheme|भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशात मोठ्या प्रमाणात शेती ( Farming) केली जाते. भारताच्या अर्थकारणात शेती व्यवसायाचा मोठा वाटा आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी सरकार सुद्धा वेळोवेळी प्रयत्न करत असते. या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात व मोठ्या प्रमाणात अनुदाने दिली जातात.

वर्षाला मिळतात ६ हजार रुपये

प्रधानमंत्री किसान योजना ( PM Kisan Yojana( ही भारत सरकारच्या अनेक महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक आहे. देशातील करोडो शेतकरी या योजनेचा फायदा घेतात. या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प कुटुंबातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. (Yearly 6K) ३ हजारांच्या चार हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

वाचा: व्हॉटसॲप वर ‘हाय’ पाठवा आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे कर्ज..

कुटुंबातील एवढ्या लोकांना मिळतो लाभ

महत्त्वाची बाब म्हणजे प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ संपूर्ण कुटुंबाला ( Family) मिळतो. एका कुटुंबातील पती-पत्नी व त्यांची मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान पती आणि पत्नी या दोघांनी स्वतंत्र योजनेचा लाभ घेण्याबाबत सुद्धा कोणताच नियम या योजनेमध्ये नाही.

१४ वा हप्ता लवकरच जमा होणार

पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. आता शेतकरी पुढच्या म्हणजेच १४ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. हा हप्ता मे महिन्यात मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. pmkisan.gov.in वर जाऊन तुम्ही या योजनेच्या अगामी हप्त्याची स्थिती तपासू शकता.

ही अट पूर्ण करावी लागणार

मात्र पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करणे आवश्यक आहे. असे नाही केल्यास १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. यासाठी गावागावांत इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत विशेष सुविधा देखील सुरू आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: All family members of farmer can get money from PM kisan scheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button