ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Pocra | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पोकरा योजेनेसाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता, जाणून घ्या सविस्तर…

Pocra | देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्रशासनाचा आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या मार्फत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून काहीसा आर्थिक हातभार लागतो. त्यामुळे शेतकरी आणखी जोमात शेतकरी शेती (Agricultural Subsidy) करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असा शासनाचा यामागील उद्देश आहे. याच योजनांपैकी एक असलेली नानासाहेब कृषी संजीवनी योजना अर्थात पोकरा (Pocra) आहे. आता याच पोकरा (Pocra) योजनेबाबत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

पोकरा योजनेबाबत शासन निर्णय
पोकरा योजनेच्या अनुदानाबाबत प्रलंबित आणि प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे. तर पोकरा (Pocra) योजनेसाठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 28 मार्च 2023 रोजी घेण्यात आला आहे. पोकरा योजना 16 जिल्ह्यांतील 5 हजार 220 गावांमध्ये राबवण्यात येते.

किती निधी वितरीत करण्यास मान्यता?
पोकरा (Pocra) योजनेसाठी अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पण अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता या शेतकऱ्यांसाठी 150 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

काय मिळतो लाभ?
पोकरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळी, फळबागा लागवडी, पॉलिहाऊसेस, विविध यांत्रिकीकरणाच्या सोयी, विविध सिंचने यांच्या वापरासाठी अनुदान देण्यात येते. तसेच गटांसाठी, एफपीओसाठी ही योजना राबवण्यात येते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Approval to disburse funds of crores for Pokra scheme, know more…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button