ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसानचा 17 वा हप्ता लवकरच मिळणार, पण यासाठी करा ‘हे’ महत्वाचे काम!

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवली आहे. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ₹6,000 आर्थिक मदत देते. ही रक्कम ₹2,000 च्या तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हप्ते जमा झाले आहेत आणि 17 व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

17 वा हप्ता कधी मिळणार?

अंदाजानुसार, 17 वा हप्ता मे किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी असल्यास हप्ता मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित eKYC पूर्ण करून कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाले 6,000 रुपये

मागील वेळी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा एक हप्ता आणि राज्य सरकारचे दोन हप्ते मिळून 6,000 रुपये जमा झाले होते. मात्र, यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत.

17 वा हप्ता मिळवण्यासाठी काय करावे?

  • eKYC पूर्ण करा: https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक टाकून eKYC पूर्ण करा.
  • कागदपत्रांची पूर्तता करा: आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, 7/12 उतारा आणि भूमी अभिलेख यांची पूर्तता करा.
  • बँक खाते आधारशी लिंक करा: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले आहे याची खात्री करा.

Web Title | PM Kisan Samman Nidhi Yojana | Good news for farmers! 17th installment of PM Kisan is coming soon, but for this do ‘this’ important work!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button