ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Cm Kisan Samman Nidhi | बिग ब्रेकींग! नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे लेखाशिर्ष तयार, जाणून घ्या शेतकऱ्यांना मिळणारं का तत्काळ हप्ता?

Cm Kisan Samman Nidhi Header ready

Cm Kisan Samman Nidhi | केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Cm Kisan Samman Nidhi) नव्याने सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान (PM Kisan Yojana) योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6 हजार रुपये शेतकऱ्यांना वितरीत केले जाणार आहेत. याबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

शासन निर्णय

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना सन 2023-24 पासुन खालीलप्रमाणे राबविण्यास संदर्भ क्र. 1 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेसाठी नवीन लेखाशिर्षाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच आता पीएम किसान योजनेचे पोर्टल नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलबरोबर जोडले जाणार आहे. यामुळे याचे एकत्रीकरण झाल्याने शेतकऱ्यांचा डाटा तत्काळ उपलब्ध होणारं आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जवळपास 1.15 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने जमिनाधारक शेतकरी आणि तसेच पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट केले आहे. राज्य शासनाला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कसा मिळणार?

  • पहिला हप्ता एप्रिल ते जुलै 2000
  • दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2000
  • तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च 2000

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Big Breaking! Namo Shetkari Samman Nidhi Yojana account ready, know why farmers will get immediate installment?

२ Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button