ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Cotton Price | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची सुधारणा; दरात होणार आणखी वाढ

Good news for farmers! Revision of cotton rates by so much There will be further increase in the rate

Cotton Price | महाराष्ट्रात कापूस हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यातील विदर्भ भागामध्ये कापूस पिकाला आवश्यक मृदा आणि वातावरण असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणत कापसाचे उत्पादन (Cotton Production) घेतात. या कापसाच्या दरामध्ये (Cotton Price) चढ-उतार होत असून आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील परभणी जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कापसाच्या दरात वाढ

परभणी, सेलू आणि मानवत किती बाजारपेठांमध्ये कापसाची आवक कमी झाली असल्यामुळे कापूस खरेदी लिलावात कापूस दरात वाढ झाली आहे. ही कापसाची दरवाढ 150 ते 450 रुपयांपर्यंत वाढली आहे. तसेच, मानवत बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल किमान 6000 ते कमाल 7415 रुपये इतका कापसाला दर मिळाला आहे. तर, सेलू बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल किमान 6250 ते कमाल 7410 रुपये एवढा कापसाला दर मिळाला आहे. तसेच, परभणी बाजार समितीत प्रतिक्विंटल किमान 7000 ते कमाल 7435 रुपये एवढा कापसाला दर मिळाला आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कापसाची आवक आणि वाढणार का दर?

दरम्यान, कापसाला देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते. बाजारपेठांमध्ये कापसाचे होणारे आवक कमी झाली असल्यामुळे ही कापूस दरवाढ झाली आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापसाची होणारी आवक कमी झाल्यास सर्वत्र कापसाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Good news for cotton growers! Increase in cotton price by There will be a big increase in the rate, know how much?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button