ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

PM Kisan Status | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जुलै महिन्यात मिळणार पीएम किसानचा 14 वा हप्ता; त्वरीत जाणून घ्या नेमका कोणत्या तारखेला?

what do you say 'This' stock gave 223% return in two months, experts advised to buy

PM Kisan Status | प्रधानमंत्री किसान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक 4 महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जाते. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचे ( PM Kisan Status) 13 हप्ते जमा झाले आहेत. शेतकरी आता 14 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ताज्या अपडेटनुसार ही रक्कम जुलैच्या कोणत्याही आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते.

14 व्या हप्त्यादरम्यान लाभार्थ्यांची संख्या होऊ शकते कमी
अनेक राज्यांत जमिनीच्या नोंदी पडताळणीचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत या यादीतूनही मोठ्या संख्येने लोकांना काढून टाकले जात आहे. या प्रक्रियेला वेळ लागत आहे. अशा लोकांना सरकारकडून पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटिसा पाठवल्या जात आहेत. पैसे परत न केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत असून, त्यापूर्वीच ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. ई-केवायसी न केल्यास शेतकरी पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकतात. आता जुलै महिन्यात कधीही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होऊ शकते.

शेतकऱ्यांनी याप्रमाणे ई-केवायसी करून घ्यावे

  • यासाठी तुम्हाला प्रथम www.pmkisan.gov.in वर जावे लागेल.
  • तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
  • त्यानंतर E-KYC च्या पर्यायावर जा.
  • यानंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका.
  • आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका.
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल.
  • ओटीपी टाकल्यानंतर तुमचे ई-केवायसी केले जाईल.

पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी शेतकरी [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. इथेही तुमची प्रत्येक समस्या दूर होईल.

Web Title: Good news for farmers! When will the 14th installment of PM Kisan come? Quickly find out new updates…

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: what do you say ‘This’ stock gave 223% return in two months, experts advised to buy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button