ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Cabinet Decision l मंत्रिमंडळ निर्णय! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शेतकरी ते मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या 75 टक्के शिष्यवृत्तीपर्यंत घेतले धडाकेबाज निर्णय

Cabinet decision! In the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar, bold decisions were taken up to 75 percent scholarship from farmers to Maratha community students.

Cabinet Decision l राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 4 जुलै 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. चला तर मग जाणून घेऊयात मंत्रिमंडळ बैठकीत कोण कोणते निर्णय घेण्यात आले आहेत.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे:

  • राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
  • मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजना. 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
  • दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता देण्यात आली आहे.
  • नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार आहे.
  • सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळणार आहे.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
  • नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत.
  • मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता 25 वर्षे करण्यात आली आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Cabinet decision! In the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar, bold decisions were taken up to 75 percent scholarship from farmers to Maratha community students.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button