ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Cm Kisan Samman Nidhi | नमो शेतकरी योजनेबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय! ‘हे’ शेतकरी ठरणार पात्र, जाणून घ्या पहिल्या हप्त्याची तारीख…

Cm Kisan Samman Nidhi | केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Cm Kisan Samman Nidhi) नव्याने सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान योजने (Cm Kisan Samman Nidhi) प्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) 6 हजार रुपये शेतकऱ्यांना वितरीत केले जाणार आहेत. आता याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग काय शासन निर्णय घेण्यात आला आहे ते जाणून घेऊयात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कोणाला मिळणार लाभ?
आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (Cm Kisan Beneficiary Status) महाराष्ट्रात जवळपास 1.15 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने जमिनाधारक शेतकरी आणि तसेच पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट केले आहे. राज्य शासनाला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. तसेच पी. एम. किसान पोर्टल ( pm kisan portal) वर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील. याबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार आहेत.

काय आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना?
शासनाच्या या नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे (Mukhyamantri Kisan Samman Nidhi) शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे. ज्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये वार्षिक दिले जात आहेत. परंतु आता या नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांना 12 हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

शेतकऱ्यांना कधी मिळणारं हप्ता?
शेतकऱ्यांना नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पहिला हप्ता एप्रिल ते जुलै महिन्यात मिळू शकतो. तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या महिन्यात मिळू शकतो. शेतकऱ्यांना या योजनेचे प्रति हप्ता 2 हजार रुपये असे तीन हप्त्याचे 6 हजार रुपये मिळणार आहेत.

Web Title: Big decision of the state government regarding the Namo farmer scheme! farmers will be eligible, know the date of first installment…

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button