ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Onion Export Ban | मोठी बातमी! कांद्याच्या निर्यातीवर बंदी अनिश्चित काळासाठी वाढवली!

Onion Export Ban| लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी अनिश्चित काळासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ३१ मार्चपर्यंत लादण्यात आलेली बंदी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी कांद्याच्या किमती वाढू नयेत यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. भारत हा जगातील प्रमुख कांदा निर्यातदार देश आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये वाढत्या कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली होती. ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू होती. यानंतर देशातील कांद्याच्या किमती निम्म्याने कमी झाल्या.

वाचा | मोदी सरकारचे मोफत रेशन अन् बऱ्याच मोफत योजना; पण यासाठी पैसा येतोय तरी कुठून? जाणून घ्या गणित

मात्र, कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांनी या निर्णयावर टीका केली होती. यानंतर कांदा निर्यातबंदी उठवली जाईल अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत होते.

परंतु, शुक्रवारी रात्री केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी अनिश्चित काळासाठी वाढवण्याचा आदेश जारी केला. सध्या कांद्याचे दर १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. डिसेंबरमध्ये हे दर ४५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते.

भारतातून बांग्लादेश, मलेशिया, नेपाळ आणि संयुक्त अरब अमीरात या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होत असते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांद्याच्या निर्यातीवर बंदी वाढवण्याचा सरकारचा निर्णय निवडणुकीशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, मात्र व्यापारी वर्गाला याचा फटका बसू शकतो

Web Title | Onion Export Ban | Big news! Onion export ban extended indefinitely!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button