ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Crop Insurance | खरीप पीक विम्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणारं फायदा

नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांची पिके भुईसपाट होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा (Financial loss) सहन करावा लागतो.

Crop Insurance | हाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू नये म्हणून सरकार (Government) शेतकऱ्यांना पीक विमा (Crop insurance) देते. खरीप पिक विमा 2021 (Kharif Crop Insurance 2019) करता 80 कोटी 36 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या (State government) माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. याच संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय (Ruling) शुक्रवार 10 जून 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. याच शासन निर्णयाच्या माध्यमातून हा निधी (Fund) कशाप्रकारे वितरीत केला जाईल. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा: Subsidy | सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय 10 लाखांच अनुदान, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

‘या’ जिल्ह्याला पिक विमा मंजूर
2021 मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते आणि नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच 10 जून 2022 रोजी एक शासन निर्णय घेऊन 80 कोटी 36 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. यामध्ये पिक विमा योजना राबवत असताना जास्त लाभार्थी असलेला जिल्हा म्हणजे नांदेड होय. याच नांदेड जिल्ह्यालाही पुन्हा एकदा या निधीच्या माध्यमातून मदत होणार आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून हिपको टोकियो कंपनीसाठी पिक विमा वितरित करण्यासाठी किंवा या कंपनीला पिक विमा देण्यासाठी कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून जी मागणी करण्यात आली या मागणीचा विचार करता 80 कोटी 36 लाख 26 हजार 501 एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे.

वाचा: PM Kisaan | पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर, ‘या’ विशेष सुविधेचा होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

7 जिल्ह्यांत राबवली जाते योजना
हिपको टोकियो कंपनीच्या माध्यमातून नांदेड, अमरावती, ठाणे, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि यवतमाळ या 7 जिल्ह्यांमध्ये पिक विमा योजना राबवली जाते. यामधील जास्त नुकसान झालेले जिल्हे आहेत. अशा जिल्ह्यात पिक विमा वाटप करण्यासाठी अनेक ठिकाणी वापरला जाऊ शकतो. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याला 436 कोटी पेक्षा जास्त निधी वितरण करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी असतील किंवा अमरावतीमध्ये तूर मूग उडीद सोयाबीन पिकांचे नुकसान झाले शेतकरी असतील. या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. परंतु त्यांच्याकडून करण्यात आली मागणी पिक विमा कंपनीकडून करण्यात आलेल्या मागण्या प्रमाणामध्ये हे पीक विम्याचे वितरण केले जाते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button