ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisaan | पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर, ‘या’ विशेष सुविधेचा होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी शेतकरी असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

PM Kisaan | खर तर, केंद्र सरकार (Central Government) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘शेतकरी भागीदारी प्राधान्य आमचे’ (Farmer Partnership is our priority) हा कार्यक्रम राबवत आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड‘ची (Kisan Credit Card) सुविधा देण्यात येत आहे. यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून किसान क्रेडिट कार्डपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज तयार करून संबंधित बँक शाखांमध्ये (Bank branch) पाठविण्यात येत आहेत.

किसान क्रेडिट कार्ड
पीएम किसान सन्मान निधी ‘शेतकरी भागीदारी प्राधान्य आमचे’ योजनेअंतर्गत, पीएम किसान निधीच्या सर्व लाभार्थ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ची सुविधा दिली जाईल. यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून किसान क्रेडिट कार्डपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज तयार करून संबंधित बँक शाखांमध्ये पाठविण्यात येत आहेत.

वाचाSugarcane | शेतकऱ्यांनो शिल्लक ऊसावर निघणार कायमचाच तोडगा, हार्वेस्टरवर मिळणार अनुदान? जाणून घ्या सविस्तर…

सरकारने जारी केल्या सूचना
सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार, पीएम किसान निधीच्या कोणत्याही लाभार्थीकडे ‘किसान क्रेडिट कार्ड’ नसल्यास, तो बँकेशी संपर्क साधून अर्ज करू शकतो. अर्जासाठी, तुम्हाला निवडलेल्या कागदपत्रांसह एक घोषणा देखील द्यावी लागेल.

वाचा: Subsidy | सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय 10 लाखांच अनुदान, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

PM किसान सन्मान निधी आम्ही तुम्हाला सांगतो की, PM किसान सन्मान निधीच्या 11 व्या हप्त्यातील 2000 रुपये 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. एप्रिल ते जुलै दरम्यान देण्यात येणारा हप्ता यावेळी 31 मे रोजी खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button