ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्यायोजना

Sugarcane | शेतकऱ्यांनो शिल्लक ऊसावर निघणार कायमचाच तोडगा, हार्वेस्टरवर मिळणार अनुदान? जाणून घ्या सविस्तर…

भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. जेथे नारिकांचा शेती व्यवसायावर कल आहे. महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) प्रामुख्याने ऊस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते.

Sugarcane | शेतकरी इतरही पीके घेतातच. मात्र ऊस पिकावर (Sugarcane crop) शेतकरी जास्त भर देताना दिसून येतात. त्याची अनेक कारणं आहेत. ऊस पिकाचे व्यवस्थापन (Sugarcane Management) करणे शेतकऱ्यांना सोपे पडते. त्याचबरोबर उसाला रास्त भाव देखील आहे. त्यामुळेच शेतकरी ऊस पिकाला (Sugarcane Peak) प्राधान्य देतात. मात्र, राज्यात यंदा अतिरिक्त ऊसाचे उत्पादन (Sugarcane production) निघाले आहे. यामुळे आता खरीप हंगामाला सुरुवात होऊनही ऊसाचे गाळप सुरूच आहे. म्हणूनच आता यावर तोडगा काढण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

ऊस उत्पादनात मोठी वाढ
यंदा ऊस उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर पुढच्या वर्षी देखील ऊस उत्पादनात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता केवळ मजुरांनी जसाची तोडणी करून कारखान्यास पाठवणे शक्य नाही. याच कारणामुळे आता राज्य सरकार देखील ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर खरेदीकरता अनुदान देण्यासाठी सकारात्मक आहे. त्याचमुळे राज्य सरकारकडून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त राजेश टोपे यांनी दिली आहे.

वाचा: Fruit Crop Insurance | महाराष्ट्रात ‘या’ योजनेंतर्गत 8 फळपिकांना विमा संरक्षण, जाणून कसा होणार फायदा

काय म्हणाले आरोग्यमंत्री?
राजेश टोपे म्हणाले की, “राज्यात यंदा शिल्लक ऊसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. 15 जूनपर्यंत मराठवाड्यातील कारखाने सुरू राहतील. 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमानात मजूर काम करू शकत नाहीत. शिवाय ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये आलेल्या मजुरांनी मे, जूनपर्यंत काम करावे,अशी अपेक्षा करणेही चुकीचे आहे. भविष्यात ऊसतोडणीसाठी मजूर मिळणेही कठीण होणार आहे. त्याच्यावरील खर्च ही वाढत आहे. कमी वेळात जास्त ऊसतोडणी करणे आणि 24 तासांत गाळप करून जास्तीत जास्त साखर उतारा मिळविण्यासाठी हार्वेस्टर गरजेचेच आहेत.”

वाचा: PM Kisaan | पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! 12व्या हप्त्यासाठी ‘या’ अटी-नियमांची करावी लागणार पूर्तता

हार्वेस्टरला का देण्यात यावे अनुदान?
ऊस हंगामात हार्वेस्टर फक्त 100 ते 120 दिवस म्हणजेच 3 ते 4 महिनेच उपयुक्त ठरतो. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर एका हार्वेस्टरची किंमत जवळपास 1 कोटी 20 लाख यापेक्षा जास्त देखील असते. त्याचमुळे या हार्वेस्टरचा आर्थिकदृष्ट्या उपयोग होत नाही. ऊसाच्या गाळपानंतर त्याचा उपयोग होत नाही. याच कारणामुळे हार्वेस्टरला अनुदान मिळणे गरजेचे आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button