ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Subsidy | सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय 10 लाखांच अनुदान, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामुळे खाद्य पदार्थांना (Foods Substance) मोठ्या प्रमाणात मागणी असून अनेक खाद्य पदार्थ उत्पादन (Food production company) करणाऱ्या कंपन्या आहेत.

Subsidy | शेतीमधून उत्पादन (Agricultural production) वाढीबरोबरच तरुणांना काम देण्यासाठी केंद्र सरकारच्या (Central Government) माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Pradhan Mantri Micro Food Processing Industry Scheme) राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत 10 लाखांचे अनुदान (Subsidy) मिळणार आहे.

योजनेचे उद्दिष्ट
शेतमालाला रास्त भाव मिळवून देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. अन्नप्रक्रिया उद्योगातील असंघटित क्षेत्रात 25 लाख विभाग आहेत. या विभागातील 74 टक्के रोजगार निर्मिती आहे. तसेच, 66 टक्के उद्योग ग्रामीण भागात असून त्यांपैकी 80 टक्के कुटुंब आधारित उद्योग आहेत. या योजनेमुळे तरुणांना रोजगार निर्माण होऊन ग्रामीण भागातील तरुणांचे स्थलांतर थांबते. तसेच, संबंधित योजनेसाठी लागणारा खर्च हा 60:40 अशा भागात आखला आहे.

वाचाSugarcane | शेतकऱ्यांनो शिल्लक ऊसावर निघणार कायमचाच तोडगा, हार्वेस्टरवर मिळणार अनुदान? जाणून घ्या सविस्तर…

योजनेचा कालावधी
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एक जिल्हा एक उत्पादन राबवली जाणार आहे. याअंतर्गत कच्चा मालाची खरेदी, सामायिक सेवा आणि उत्पादनाचे विपणन सहज होऊ शकेल. उद्योगाच्या स्वरूपानुसार त्याचे अनुदान ठरलेले आहे. पॅकेजिंग, विपणन आणि ब्रँडिंगसाठी 50 टक्के अनुदान कौशल्य प्रशिक्षण आणि भांडवल अनुदान प्रति बचत गटात 4 लाखांचे भांडवल देण्यात येणार आहे.

अर्जासाठी पात्रता?
संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी शिक्षणाची अट नसून विविध कागदपत्रांचीही अट नाही. तसेच, या योजनेसाठी शेतकऱ्यांबरोबरच विविध सहकारी संस्था, निर्यातदार शेतकरी, बचत गट आणि शासकीय संस्था अर्ज करू शकतात.

वाचा: Yojana | सरकारकडून ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार मोफत कडधान्य आणि भाजीपाल्यांचे बियाणे, जाणून घ्या पात्रता

संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.pmfme.mofpi.gov.in आणि https://nulm.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. याशिवाय या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button