ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Swanidhi Yojana | पीएम स्वनिधी योजनेंतर्गत मिळतंय 50 हजारांचं अर्थसहाय्य, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज

पीएम स्वनिधी योजनेसंदर्भातील एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. पीएम स्वनिधी योजनेसाठी (PM Swanidhi Yojana) 6 जून 2022 पासून अर्ज सुरू झाले आहेत.

PM Swanidhi Yojana | कोरोनाच्या (Corona) काळात छोट्या मोठे व्यवसायिक (Commercial) दुकानदारांचे (Shopkeeper) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता याच व्यवसायिक दुकानदारांना दिलासा देण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेंतर्गत मदत (Help) करण्यात येणार आहे. या व्यावसायिकांना 10 हजारांचे खेळते भांडवल (Capital) म्हणून निधी वितरीत करण्यात येणार आहे. ही योजना 2020 मध्ये आली होती. चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पीएम स्वनिधी योजना
या योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांचे भांडवल करणाऱ्या व्यावसायिक दुकानदारांना 20 हजार रुपये दिले गेले आहे. आता या अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवल दुकानदारांना दिले जात आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर तुम्हाला 10 हजार रुपयापर्यंत खेळते भांडवल कर्ज म्हणून दिले जाईल. त्यानंतर या कर्जाची जर वेळेत परतफेड केली, तर आपल्याला दुसऱ्या टर्ममध्ये 20 हजारांचे आणि तिसऱ्या टर्ममध्ये 50 हजारांचे कर्ज मिळेल.

वाचा: Crop Insurance | खरीप पीक विम्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणारं फायदा

योजनेचे टप्पे
पीएम स्वनिधी योजनेच्या पहिल्या टर्मसाठी 42 लाख 11 हजार 981 लाभार्थ्यांना या ठिकाणी कर्जासाठी अर्ज केले होते. त्यामधील 30 लाख 722 लाभार्थ्यांना कर्ज देण्यात आले होते. ज्यातील 7 लाख 36 हजार 975 लाभार्थ्यांनी कर्जाची परतफेड करून दुसऱ्या टप्प्यासाठी मागणी केली आहे.

योजनेचा कालावधी
दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख 29 हजार 402 लाभार्थ्यांनी 20 हजारांच्या भांडवलासाठी अर्ज केले आहेत. तर त्यामधील 3 लाख 48 हजार 783 लाभार्थ्यांना 2019 मध्ये कर्ज वितरण करण्यात आले. आता जून 2022 तिसऱ्या टप्प्यातील अर्ज सुरू झाले आहेत. यासाठी 20 लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ज्यातील 4 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहे आणि याच्या वितरणाची प्रक्रिया देखील लवकरच सुरू होईल. ही योजना डिसेंबर 2024 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.

वाचा: PM Kisaan | पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर, ‘या’ विशेष सुविधेचा होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

कोणते व्यवसायिक करू शकतात अर्ज?
या योजनेच्या लाभासाठी फळविक्रेते, वडापावची गाडी, छोटे कपड्याचे दुकान, भाजोविक्रेते अशा प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय असलेल्या दुकानदारांना हे कर्ज देण्यात येणार आहे. या स्वानिधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपला अर्ज भरावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button