ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Agricultural Machines | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंत्र खरेदीसाठी राज्य सरकार देणार ‘इतके’ अनुदान, जाणून घ्या अटी

Agricultural Machines | केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण (Agricultural Machines) योजना सुरू केली आहे. यासाठी 280 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी केंद्राकडून 60% तर राज्य सरकारकडून 40% अनुदान मिळणार आहे.

Agricultural Machines | मशागतीच्या कामांसाठी लागणारे मनुष्यबळ वेळेत मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांना मशागतीसाठी विविध यंत्रांचा वापर करणे भाग आहे. मात्र या यंत्रांच्या किमती खूपच असतात. शेतकऱ्यांना त्या न परवडणाऱ्या आहेत. यासाठी केंद्र सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजना चालू केली आहे. या योजनेमार्फत यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. मात्र केंद्र सरकारच्या काही अटींमुळे राज्यातील अनेक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत नव्हते. मात्र आता राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

काय आहे योजना

केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या धर्तीवर राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण ही नवीन योजना राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 280 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत विविध यंत्र खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, रोटावेटर, ऑपरेटेड विडर, पलटी, नांगर पेरणी, मळणी यंत्र इत्यादी यंत्र खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना 50% तर इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान मिळणार आहे. यासाठी Mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवरून अर्ज करता येईल.

ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार इतके अनुदान

या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. त्यासाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी 50% किंवा 1 लाख 25 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल. तसेच इतर शेतकऱ्यांना 40% किंवा एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

•सातबारा, आठ अ (Satbara, 8A)
•आधार कार्ड (Adhar Card)
•बँक पासबुक (Bank Passbook)
•जातीचा दाखला (Caste certificate)
•यंत्राचे कोटेशन (Quotation)
•परीक्षण अहवाल (Testing report)

या योजनेमुळे जे शेतकरी केंद्र सरकारच्या योजनेत पात्र ठरत नव्हते ते आता पात्र ठरणार आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नव्हतं त्या शेतकऱ्यांनाही आता ते मिळणार आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button