ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Gram Kendra | केंद्राकडून हरभरा खरेदी केंद्र बंद! हरभरा उत्पादन खितपत पडल्याने शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

शेतकरी अनेक संकटावर मात करुन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.

Gram Kendra | मात्र, कधी निसर्गामुळे (Nature) तर कधी खरेदी केंद्रावरील (Shopping center) अटी-नियमांमुळे (Terms and Conditions) शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. अशातच आता केंद्र सरकारने (Central Government) राज्यातील हरभरा खरेदी केंद्र बंद केल्याने एकच गोंधळ उडाला आहे. हरभरा खरेदीचे (Purchase of gram) उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे केंद्राकडून हरभरा खरेदी करण्याचे थांबवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

शेतकरी विक्री अभावी अडकून
हरभरा खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊन शिल्लक हरभऱ्याचे होत असलेले नुकसान आणि बाजार पेठांमध्ये चांगल्या प्रतीचा हरभरा विकण्यासाठी गेल्यास हमीभावापेक्षा कमी दरात त्याची विक्री होत आहे. त्यामुळे हरभरा विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर गाड्या घेऊन आलेले शेतकरी विक्री अभावी अडकून पडले आहेत. केंद्र शासनाने उर्वरित शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

वाचा:  Subsidy | सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय 10 लाखांच अनुदान, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

काय आहे नाफेडची भूमिका?
यापूर्वी हरभरा खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर ठरवून देण्यात आला होता. त्यामुळे खुल्या बाजारपेठेपेक्षा प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना 900 रुपये अधिकचा दर मिळत होता. मात्र, आता खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 900 रुपये देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. या मागणीवर नाफेडने आतापर्यंत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
मागील काही महिन्यांपासून हरभरा खरेदी केंद्रातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत होता. हंगामाच्या सुरुवातीला, किमान आधारभूत किंमत (MSP) जास्त असतानाही शेतकरी खुल्या बाजारात कमी दराने विक्री करत होता. हंगामाच्या अखेरीस भावात मोठी तफावत पाहून शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीस सुरुवात केली. त्यामुळे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होऊन नाफेडने खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली त्यांचे काय असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केल्यामुळे हरभरा खरेदी केंद्र पुन्हा सुरू झाली होती. मात्र, पुन्हा खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

वाचा: Crop Insurance | खरीप पीक विम्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणारं फायदा

उपमुख्यमंत्री काय म्हणाले?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हणाले, “यंदा हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. 32.83 लाख मे. टन अपेक्षित उत्पादन असताना जवळजवळ 8.20 लाख मे. टन एवढे वाढीव उत्पादन झाले आहे. त्यामुळे हरभऱ्याची खरेदी ही 28 जून 2022 पर्यंत वाढवावे अशी केंद्र सरकारला विनंती केली आहे. हरभऱ्याच्या खरेदीची अंतिम तारीख 29 मे 2022 असून तारीख वाढवण्याबाबतच्या निर्णयाला एक-दोन दिवसात मंजूरी देणे अपेक्षित असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button