ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
फळ शेतीयोजना

Subsidy | फूल-फळशेती आणि मसाले पिक लागवडीसाठी ‘या’ योजनेंतर्गत अर्ज सुरू, त्वरित करा ‘असा’ अर्ज

शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध पिकांसाठी योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत अनुदान दिले जाते.

Subsidy | एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत (Integrated Horticulture Development Campaign) राष्ट्रीय फलोत्पादन अभियान हे महाराष्ट्रामध्ये 2022-23 मध्ये राबवण्यासाठी मंजुरी देणारा एक महत्वाचा शासन निर्णय 3 जून 2022 रोजी घेण्यात आला. या अभियानासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत अशा प्रकारचे आव्हान कृषी विभागाच्या (Department of Agriculture) माध्यमातून करण्यात आले आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना फलोत्पादनासाठी अनुदान (Horticulture subsidy) दिले जाते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा फॉर्म किंवा अर्ज कसा भरावा. ज्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (National Horticulture Campaign) राबवले जाते.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
या अभियानाअंतर्गत फळे, भाजीपाला, कंदमुळे, मशरूम मसाले, फूल, सुगंधी वनस्पती, नारळ, काजू, कोको, बांबू इत्यादी उत्पादनाच्या विकासाकरता ही योजना राबवली जाते. त्यामध्ये राज्याचा 40 टक्के आणि केंद्राचा 60 टक्के अशा निधीच्या प्रमाणामध्ये ही योजना राबवली जाते. 2022-23 मध्ये राबवण्यासाठी 199.33 कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी काही लक्षांक देखील देण्यात आले आहेत. लहान नर्सरीसाठी 15 लाख रुपये प्रतिहेक्‍टर अशाप्रकारे अनुदान दिले जाते. ज्यात खाजगी सेक्टरमध्ये पब्लिक सेक्टरसाठी एक आणि खाजगी सेक्टरसाठी 18 अशा प्रकारचे लक्षांक देण्यात आले आहेत.

वाचाYojana | काय सांगता? ‘या’ योजनेंतर्गत मिळतेय शेत जमीन, जाणून घ्या पात्रता आणि अटी

फळांसाठी अनुदान
नर्सरीच पुनरुज्जीवन करणे. जुन्या नर्सऱ्यांमध्ये वाढ करणे किंवा त्याचे पुनरुज्जीवन करणे. यासाठीही याअंतर्गत लाभ दिला जातो. त्याचप्रमाणे फळबागांसाठीही अनुदान दिले जाते. ज्यात ड्रॅगन फ्रुट, द्राक्ष, किवी अशाप्रकारच्या फळांच्या लागवडीसाठी लक्षांक दिले आहेत. त्याचप्रमाणे याअंतर्गत स्ट्रॉबेरीची लागवड, स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. त्याप्रमाणे आंब्याची लागवड, ब्लूबेरी लागवड अशा प्रकारच्या लागवडींनाही याअंतर्गत अनुदान दिलं जातं.

मसाले अनुदान
विविध प्रकारच्या फुलाच्या लागवडींना देखील याअंतर्गत अनुदान दिले जाते. याचप्रमाणे मसाले पिकांमध्ये हळदीची लागवड, जिंजर आद्रक, मिरचीची लागवड अशा प्रकारच्या लागवडीलाही अनुदान दिले जाते. याचप्रमाणे मशरूमची लागवड, स्पॉन मेकिंग युनिट अशाप्रकारचे युनिट तयार करण्यासाठीसुद्धा याअंतर्गत अनुदान दिले जाते. त्याप्रमाणे यासर्व लागवड करत असताना शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं.

वाचा: Subsidy | ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरी अनुदानात मोठी वाढ, शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ लाख

अर्ज कसा कराल?
सामूहिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, मधूमक्षिका पालन, शेतकरी प्रशिक्षण, पॅक हाऊस कांदा चाळ, रायपनिंग चेंबर, फिरते विक्री केंद्र अशा प्रकारच्या विविध योजनेअंतर्गत राबवल्या जातात. अशा प्रकारच्या बाबीसाठी भौतिक आणि आर्थिक लक्षांकासह हा शासन निर्णय घेऊन 199.7 30 कोटींचा निधी देऊन ही योजना राज्यामध्ये राबविण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेच्या लाभासाठी महाडीबीटी mahiti.gov.in यावर अर्ज भरले जातात. यासाठी लाभार्थ्याला संपूर्ण माहिती देऊन आणि कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरावा लागेल. जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button