ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Aarth Sankalp | फक्त एसटी प्रवासात 50 टक्के सूटचं नाहीतर महिलांसाठी अर्थसंकल्पात केल्या ‘या’ जबरदस्त घोषणा, जाणून घ्या…

Aarth Sankalp | राज्याच्या अर्थसंकल्पात आज महिलांसाठी सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे . राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना (Aarth Sankalp) राज्यांतर्गत प्रवास करताना केवळ अर्धे तिकीट मोजावे लागणार आहे. महिलांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी लवकरच राज्यात सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असून महिला केंद्रीत वाहतूक (Aarth Sankalp) धोरण तयार करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महिलांसाठी उपाययोजना राबवणार
शहरात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्र सरकारच्या मदतीने 50 वसतिगृहे उभारण्यात येणार असल्याची घोषणाही (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्याचा 2023-2024 चा अर्थसंकल्प गुरुवारी येथे सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र मुली आणि महिलांच्या आरोग्य, आर्थिक सुरक्षा आणि इतरांसाठी अनेक उपाययोजना राबवणार आहे.” याबाबत महाराष्ट्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात (Aarth Sankalp) अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

महिलांसाठी एसटी प्रवास निम्म्या दरात
तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत महिलांना दिली जाणार आहे. महिला खरेदीदारांना घर खरेदी करताना 1 टक्के सूट देण्यात आली आहे. सध्याच्या अटींनुसार, महिला 15 वर्षांपर्यंत पुरुष खरेदीदाराला घर विकू शकत नाही. ही अट शिथिल करून इतर सवलती दिल्या जातील.

महिलांसाठी केल्या मोठ्या घोषणा

  • महिला बचतगटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारण्यात येणार आहेत.
  • कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर उभारण्यात येणार आहे.
  • मुंबईत महिला एकता मॉल उभारण्यात येणार आहे.
  • महिलांच्या सुरक्षिततेसाठी, सोयीस्कर प्रवासासाठी महिला-केंद्रित पर्यटन धोरणाची अंमलबजावणी करणे.
  • आई सुरक्षित आणि घर सुरक्षित अभियानांतर्गत 4 कोटी महिला आणि मुलींची आरोग्य तपासणी आणि औषधे दिली जाणार आहेत.
  • आशा स्वयंसेविकांना 3500 ते 5000 रुपये मानधन दिले जाईल.
  • गट प्रवर्तकांचे मानधन 4700 रुपयांवरून 6200 रुपये करण्यात येणार आहे.
  • अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 रुपयांवरून 10 हजार रुपये करण्यात येणार आहे.
  • मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरून 7200 रुपये करण्यात येणार आहे.
  • अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4425 रुपयांवरून 5500 रुपये करण्यात येणार.
  • अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, सहायकाची 20 हजार पदे भरण्यात येणार आहेत.
  • अंगणवाड्यांद्वारे घरपोच अन्न वितरणासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे.
  • शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत.
  • पीडित महिला, लैंगिक शोषणमुक्त महिला, कौटुंबिक समस्या असलेल्या महिलांसाठी स्वाधार आणि उज्ज्वला या दोन योजना एकत्र करून केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पीडित महिलांना निवारा, कायदेशीर सेवा, आरोग्य सेवा, समुपदेशन आदी सुविधा पुरविल्या जातील. या योजनेत 50 नवीन शक्ती सदन बांधण्यात येणार आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Women now get 50 percent discount on ST travel, Devendra Fadnavis’s big announcements for women in the budget

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button