ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Maharashtra Budget 2023 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार, अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget 2023) अधिवेशन 27 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत चालणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वित्त विभागाचा कार्यभारही आहे. त्यांनी 9 मार्च रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर केला. राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेली पाच विधेयके अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली जातील, तर इतर आठ विधेयके अद्याप मंजूर व्हायची आहेत.

वाचादुष्काळात तेरावा महिना! रिझर्व्ह बँकेने ‘या’ बँकेला लावला टाळा, आता शेतकऱ्यांच्या पैशाचं काय होणार

शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत अर्थसंकल्पात जोरदार घोषणा केल्या आहेत. सामान्यांसाठी तसेच महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी तर धडाकेबाज घोषणा केल्या आहेत. म्हणजेच अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2023) राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा

  • प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारचे योगदान.
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
    • राज्य सरकार प्रति शेतकरी 6000 रुपये देईल
    • केंद्र 6000 आणि राज्य 6000 हजार प्रति वर्ष दोन्ही मिळून शेतकऱ्यांना 12 हजार मिळणार आहेत.
    • 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार.
    • राज्य सरकार 6900 कोटींचा बोजा उचलणार आहे.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे. पीक विमा राज्य सरकार फक्त एकाच रुपयात देणार आहे. पूर्वीच्या योजनेत शेतकऱ्यांना 2 टक्के प्रीमियम भरावा लागत होता. आता शेतकऱ्यांवर बोजा नाही. राज्य सरकार हप्ता भरणार आहे. शेतकऱ्यांचा पीक विमा अवघ्या 1 रुपयात उपलब्ध करून दिला जाईल. यातून राज्य सरकार 3312 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will now get 12 thousand, Devendra Fadnavis’ big announcement in the budget

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button