ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Fisheries | शेतकऱ्यांनो कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी करा मत्स्यपालन, ‘या’ योजनेंतर्गत सरकार देतय 60 टक्के अनुदान

आपल्या भारत देशात प्रामुख्याने शेती व्यवसाय केला जातो. कित्येक नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेती (Agriculture) व्यवसायावर अवलंबून आहे.

Fisheries | परंतु केवळ शेती व्यवसाय करूनच शेतकरी नफा मिळवू शकतात असे नाही. कारण शेतकरी शेतीशी (Agricultural Information) संलग्न असलेल्या व्यवसायातून देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांची आर्थिक (Financial) स्थिती सुधारण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देते. शेतकरी मत्स्यपालन शेतीतून (Fish Farming) मोठ्या चांगला नफा कमवू शकतात. सरकार देखील त्यासाठी अनुदान (Subsidy) देते.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
शेतकरी मित्रांनो तुम्हीही कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्हाला मत्स्यपालनाचा व्यवसाय (Business) करू शकता. सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत (Pradhan Mantri Fisheries Sampada Yojana) शेतकऱ्यांना मत्स्यपालनासाठी अनुदान दिले जाते. या अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी मस्त्यपालनाचा व्यवसाय सुरू करू शकतात.

वाचा: Tur | केंद्र सरकारचा तूर उत्पादकांना मोठा फटका! देशात तूर आणि उडीद आयातीसाठी केला पुढील ‘इतक्या’ वर्षांसाठी करार

शेतकऱ्यांना किती मिळते अनुदान?
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल 60 टक्के अनुदान (Subsidy) मिळणार आहे. तर अनुसूचित जातीमधील महिला परुषांना 60 तर सर्वसाधारणसाठी 40 टक्के अनुदान राहणार आहे. इतकचं नाही, तर शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. ही योजना केंद्र व राज्य सरकारद्वारे राबवली जात आहे.

वाचा: गावातील ‘ही’ कामे नडली तर घ्या तलाठ्याची भेट ! मग सगळी सरकारी काम होणार एकदम थेट ; पहा तलाठी नक्की कोणती कामे करतात…

कुठे कराल अर्ज?
शेतकऱ्यांना या मत्स्य व्यवसाय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागेल. ज्यासाठी pmkisanyojna या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांना अर्ज करावा लागेल. इतकचं नाही तर शेतकऱ्यांना बायोफ्लॉक (Biofloc Technology) आणि आरएएस तंत्रज्ञान (RAS Technology) वापरून देखील हा व्यवसाय करता येईल व सरकार त्यासाठी अनुदान देत आहे. ज्यासाठी नाबार्डकडून शेतकऱ्यांना या 60 टक्के अनुदानावर टाक्या आणि तलावासाठी निधी देखील उपलब्ध करून दिला जात आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers should do fish farming for more production at less cost government is giving 60 percent subsidy under this scheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button