ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञानयशोगाथा

Vermicompost | भारीचं की! ‘या’ तंत्रज्ञानाच्या वापराने युवकाने केली गांडूळ खताची निर्मिती, जाणून घ्या निर्मितीचे तंत्र

Vermicompost | सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराच्या पूर्वेला तीन किलोमीटरवर साखराळे गाव लागते. याच परिसरात सुमारे २८ वर्षे वयाच्या तरुण शेतकरी प्रतीक पवार यांच्या कुटुंबाची शेती आहे. बीएस्सी हॉर्टिकल्चर (Horticulture) असे शिक्षण त्याने घेतले आहे. त्याने परदेशात जाऊन ‘एमएस्सी’ चे शिक्षण घ्यावे अशी कुटुंबाची इच्छा होती. त्या दृष्टीने तयारी सुरू होती परंतु काही तांत्रिक कारणांमुळे निर्णय थांबवावा लागला. मात्र त्याचवेळी बदलत्या शेतीची गरज व मागणी ओळखून इथेच काहीतरी उद्योग सुरू करायचे प्रतीकने ठरवले.

त्यांच्या घरची सुमारे १४ एकर शेती व त्यातील लागवडीयोग्य ११ एकर शेती आहे. प्रतीकने शेतीची पूर्ण जबाबदारी ही स्वतःकडे घेतली. त्यामुळे आपल्या नवीन विचाराच्या काही तरुणांना एकत्र करून त्यांनी गावात शिवार फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली. ‘व्हीएसआय’ संस्थेचे माजी कीटकशास्त्रज्ञ ए. एन. साळुंखे यांचे मार्गदर्शन या तरुणांना मिळाले. त्यातूनच मग उत्पादनवाढीचे नवे प्रयोग सुरु केले गेले. शेतकरी परिसंवाद, शेतकऱ्यांच्या प्लॉटला भेटी, निरीक्षणे नोंदवणे असे उपक्रम सुरू केले. उसाचा उत्पादन खर्च कमी करणे यावर देखील भर देण्यात आली. एकात्मिक खत व्यवस्थापन हा त्यातील महत्त्वाचा विषय होता. रासायनिक खते ही वाया जाऊ नयेत, ती पिकांना पुरेपूर लागू व्हावीत त्यासाठी गांडूळ खतात ती ‘मिक्स’ करून देणे हा पर्याय पुढे करण्यात आला. त्यातूनच मग उत्पादन वाढेल व जमिनीचा पोतही सुधारेल असे नियोजन होते.

गांडूळ खताची निर्मिती

तर काही शेतकऱ्यांच्या मागणीवरून व गरजेनुसार गांडूळखताची निर्मिती करायचे असे प्रतीकने ठरवले. त्यासोबत शिक्षणाची जोड होतीच. प्रतीक यांची पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग लगत कासेगाव येथे एक एकर शेती आहे. त्या ठिकाणी २०१८ पासून हा प्रकल्प सुरू झाला. एकात्मिक खत व एकूण व्यवस्थापनाद्वारे प्रतीक यांनी आपल्या घरच्या गांडूळखताचा शेतीतही वापर सुरू केला व विक्रीही सुरू केली.

वाचा: सोने खरेदीची उत्तम संधी! सोने आणि चांदी ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

गांडूळ खत निर्मितीचे तंत्र

  • सुरवातीला शेतकऱ्यांकडून दर्जेदार शेण हे खरेदी केले जाते.

-प्लॅस्टिक ताडपत्रीचा अर्थातच टेट्राबेडचा उपयोग केला जातो. त्याचे क्षेत्रफळ हे १० बाय ४ बाय असे म्हणजेच दोन फूट असे ठेवले आहे.

  • सुरवातीलाच ७५ टक्के बेड हा शेणाने भरला जातो आणि २५ टक्के बेड हा रिकामा ठेवला जातो.
  • बेडवर सलग तीन दिवस २० ते २५ लिटर पाणी वापरून त्यातील उष्णता ही बाहेर काढली जाते.
  • त्यात एक फुटाला एक किलो म्हणजे बेडची लांबी जितकी आहे त्यानुसार गांडूळ कल्चर त्यात सोडण्यात येते. त्यानंतर बेड गोणपाटाने झाकून घेतला जातो.

-त्यानंतर दर पंधरा दिवसांनी गूळ, बेसन आणि लाभदायक जिवाणू यांची स्लरी तयार केली जाते. प्रत्येक बेडवर दहा लिटर या पद्धतीने दर पंधरा दिवसांनी ही स्लरी सोडली जाते.

  • त्यात सुमारे साठ दिवसांची एक बॅच अशा वर्षाला सुमारे चार बॅचेस घेण्यात येतात. एकसारखे दर्जेदार गांडूळ खत वर्षाला सुमारे तीनशे टनांच्या आसपास तयार होते.

-गांडूळखत चाळल्यानंतर उर्वरित घटकाचा पुन्हा वाफे पद्धतीने ढीग लावण्यात येतो.

वाफा हा १० बाय २.५० फूट बाय १.५० फुटाचा असतो. टेट्राबेड पद्धतीप्रमाणेच त्यातही पुन्हा सर्व तंत्राचा वापर हा केला जातो.

  • त्यात आता प्रतीक सांगतात की मुख्य भरणीच्या आधी हे गांडूळखत रासायनिक खतात ‘मिक्स’ करून दिले तरी चालते. मुख्य भरणीवेळी एका सरीत रासायनिक व एका सरीत गांडूळ खत या पद्धतीने देता येते. अर्थातच माती परिक्षणानुसार याचा वापर हा योग्य राहील.

खताची विक्री व्यवस्था

सांगली, कोल्हापूर व लगतच्या कर्नाटक भागातील द्राक्ष, ऊस, भाजीपाला व अन्य पिकांसाठी शेतकऱ्यांकडून या खताला चांगलीच मागणी आहे. जागेवर प्रतिटन नऊ हजार रुपये तर १०० किलोमीटर परिसरापर्यंत दहा हजार रुपये टन अशी या खताची विक्री होते. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी साखरेच्या वापरलेल्या ४० किलोच्या पोत्यामधून विक्री होते. खताव्यतिरिक्त गांडूळ कल्चर ३०० रुपये प्रति किलो तर व्हर्मीवॉश प्रति लिटर ५० रुपये यांचीही विक्री होते.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यांचा खरीप पीक विमा 2022 मंजूर, जाणून घ्या

घरच्या उसाला झाला याच फायदा

तर एकात्मिक व्यवस्थापनातून प्रतीक यांना घरच्या उसाचे एकरी ९० ते ९२ टन तर खोडव्याचे ६० ते ६५ टन उत्पादन मिळत आहे. फेरपालट म्हणून सोयाबीन तर बेवडासाठी हरभरा पिके घेण्यात येतो. बाजारपेठेचा अंदाज घेऊन मिरची व अन्य नगदी पिके २० गुंठ्यात घेतली जातात. प्रतीक सांगतात की पूर्वी रासायनिक खतांचा खर्च प्रति एकर ४० ते ४५ हजारांच्या घरात व्हायचा. परंतु आता गांडूळ खताच्या वापरामुळे त्यात ३० ते ४० टक्के बचत ही झाली आहे. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता ही वाढली असून खते वाया जाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. प्रतीक यांचे मित्र धैर्यशील पाटील देखील
तीन वर्षांपासून या खताचा वापर करीत असून त्यांना देखील त्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शुध्द रोपांचे संवर्धन कसे कराल?

जर बेणे हे चांगले व शुध्द असेल तर उत्पादन हे चांगले मिळते. त्या दृष्टीने प्रतीक व सहकाऱ्यांनी यंदा कोइमतूर येथून उसाची उतीसंवर्धित रोपे ही आणली आहेत. परंतु आता त्यांची शुद्धता जपण्याचा प्रयत्न आहे. मग त्यातून दर्जेदार बेणे परिसरातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Youth made vermicompost using new technology

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button