ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Subsidy | गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या ‘या’ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी 98 कोटी 58 लाखांचा निधी मंजूर, जाणून घ्या सविस्तर

Subsidy | यंदा खरीप हंगामाला सुरुवात झाल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे काही ना काही संकट येतच आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली. पुन्हा मान्सून (Monsoon in Maharashtra) सक्रिय झाला आणि जोमात पेरण्या झाल्या. मात्र, पीक (Crop) उगवून आले की, गोगलगायींच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) फटका बसला. त्यानंतर राज्यात अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली. आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (Agriculture) मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचवेळी गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

वाचा: शेतकऱ्यांनो ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी मिळतंय अनुदान, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

गोगलगायींमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर
गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता याच शेतकऱ्यांना (Agriculture in Maharashtra) राज्य सरकारकडून दिलासा मिळणारं आहे. या नुकसानग्रस्त तीन जिल्ह्यांना राज्य शासनाकडून तब्बल 98 कोटी 58 लाख मदतीसाठी निधीस मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 55 कोटी निधी वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी
ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची पिके चांगली आल्यानंतर गोगलगायींमुळे ती नष्ट झाली. याचमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी सातत्याने सरकारकडे नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी करत होते. त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन निर्णयात बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून मागणी केली जात होती.

वाचा: पेरूच्या पानाचे ‘हे’ पाच फायदे माहीत आहेत का? जाणून घ्या सविस्तर

कशी मिळणार मदत?
बीड जिल्ह्यातील 3822.35 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. ज्यासाठी 2 कोटी 59 लाख रुपयांची मदत जाहीर झालीय. लातूर जिल्ह्यातील 59764.30 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ज्यासाठी 4 कोटी 63 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातील 283.83 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. या जिल्ह्यासाठी 19 कोटी रुपयांची मदत जाहीर झालीय.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: 98 crore 58 lakhs fund approved for farmers of districts affected by snails, know more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button