ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! प्रोत्साहन अनुदानासाठी 50 टक्के निधी वितरित, जाणून घ्या कधी होणार खात्यात जमा

Subsidy | नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी 16 सप्टेंबर 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2017-18-19-20 या कालावधीत किमान दोन वर्षे पीक कर्ज (Crop Loan) घेतले असेल आणि ते त्या पीक कर्जाची परतफेड केली असेल, अशा शेतकऱ्यांना (Agriculture) राज्य सरकारकडून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान (Subsidy) 15 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाईल असेही सांगण्यात आले होते. या अनुदानाच्या याद्या बँकांमध्ये आल्या आहेत.

बँकांमध्ये आल्या याद्या
खरं तर, कुठल्याही अनुदानाची घोषणा केल्यानंतर ते अनुदान त्वरित खात्यात जमा होत नाही. त्यासाठी अटी निकष कागदपत्रे अशा अनेक बाबींची पडताळणी केली जाते. यासाठी बराच कालावधी लागतो. 15 सप्टेंबर रोजी प्रोत्साहन अनुदान खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले होते. त्यावेळी अनुदान खात्यात जमा झाले नाही, मात्र बँकेत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आल्या. म्हणजेच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणारं आहे.

वाचा: सोने खरेदीची उत्तम संधी! सोने आणि चांदी ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

50 टक्के निधी वितरित
आता याच 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी 50 टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. त्यासाठी 2 हजार 350 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. मात्र लगेच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. त्यासाठी शासन निर्णयात काही अटी शर्ती आणि तरतुदी देण्यात आल्या आहेत. ज्याचे बायोमेट्रिककेली जाईल. या अटी, शर्ती यांची पूर्तता करूनच शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाईल. ज्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. मात्र, 50 टक्के निधी वितरित झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

वाचा: काय सांगता? ‘ही’ शेती शेतकऱ्यांचे बदलेल नशीब, कमी काळातच मिळेल बंपर नफा

लिंकिंग प्रक्रिया आवश्यक
शेतकऱ्यांनी आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे. अन्यथा हे अनुदान मिळण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करावे लागेल. जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच तुमचे नाव या लाभार्थी यादीमध्ये येईल. अन्यथा तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! 50 percent of funds distributed for incentive grant know when the account will be deposited

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button