ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

बिग ब्रेकिंग: आता ‘या’ वयोगटातील तरुणांना काढता येणार मतदान कार्ड, वाचा निवडूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय

मतदार यादीत नावांच्या समावेशाबाबत निवडणूक आयोगाने एक मोठा अपडेट केला आहे.

Voting Card | खरं तर, आतापर्यंत केवळ 18 वर्षांवरील तरुणांनाच मतदार यादीत (Voter list) नाव समाविष्ट केले जात होते. मात्र, आता ही वयोमर्यादा कमी करण्यात आली आहे. म्हणजेच आता 17 वर्षांवरील तरुणांनाही आपले नाव मतदान यादीत समाविष्ट करता येणार आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) जारी केलेल्या सूचनांनुसार, 17 वर्षांपेक्षा जास्त वयाचे तरुण यासाठी आगाऊ अर्ज करू शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी सर्व राज्यांच्या सीईओ, ईआरओ आणि इरोजना निर्देश दिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या सूचना
आयोगाच्या सूचनेनुसार, त्यांनी असा तंत्रज्ञान (Technology) उपाय आणला आहे. ज्यामुळे तरुणांना आगाऊ अर्ज करण्याची सोय होईल. अशा परिस्थितीत आता तरुणांना वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत थांबावे लागणार नाही. आयोगाने जारी केलेल्या सूचनेनुसार आता मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तरुणांना वर्षाच्या 1 जानेवारीची वाट पाहावी लागणार नाही. यापूर्वी, 18 वर्षे वयोमर्यादा पूर्ण केल्यानंतर, नावे जोडण्यासाठी अर्ज 1 जानेवारीलाच करता येत होता.

वाचा: Subsidy | नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांच्या अनुदानासाठी काय आहेत पात्रता आणि अटी? जाणून घ्या सविस्तर…

Voting Aadhaar Link | मतदान कार्ड आधारशी लिंक
निवडणूक आयोग आणखी एक मोठे पाऊल उचलणार आहे. मतदार यादीसाठी आवश्यक असलेले सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड. आता निवडणूक आयोगाने मतदान कार्ड आधारशी लिंक करण्यास सुरूवात केली आहे. याअंतर्गत 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीत मोहीम राबवून मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक नावाचा आधार क्रमांक संकलित केला जाणार आहे. ते आधारशी लिंक केले जाईल.

वाचा: Berkeley Fertilizer | काय सांगता? केवळ 18 दिवसांतच पिकांना ‘हे’ खत देतंय पोषण, जाणून घ्या तयार करण्याची पद्धत

आधार क्रमांक देण्याची ऑनलाइन सुविधा
बूथ लेव्हल ऑफिसर घरोघरी जाऊन मतदारांकडून आधार कार्ड क्रमांक गोळा करतील. तो नवीन फॉरमॅटमध्ये येणाऱ्या फॉर्म 6-B वर आधार कार्डचा नंबर टाकेल. क्रमांक घेतल्यानंतर आठवडाभरात मतदाराच्या नावासोबत आधार कार्ड क्रमांक लिंक केला जाईल. मात्र, मतदारांना आधार कार्ड क्रमांक ऑनलाइनही देता येणार आहे. यासाठी फॉर्म 6-बी ऑनलाइनही उपलब्ध असेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Voter card can now be drawn for the youth of 17 age read the important decision of the Election Commission

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button