ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Mahashivratri 2024 | कधी आहे महाशिवरात्री; आणि कशी साजरी करावी जाणून घ्या सविस्तर …

Mahashivratri 2024 | When is Mahashivratri; And know how to celebrate in detail...

Mahashivratri 2024 | माघी गणेशोत्सव आणि गुप्तनवरात्रीनंतर आता शिवभक्तांच्या मनात उत्साह निर्माण करणारी महाशिवरात्री जवळ आली आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी होणाऱ्या या पवित्र दिवशी *(Festival) भगवान शिवाची भक्तीमय उपासना केली जाते.

यंदा ८ मार्च रोजी रात्री ९.५७ वाजेपासून ९ मार्च रोजी संध्याकाळी ६.१७ वाजेपर्यंत चतुर्दशी तिथी असल्यामुळे ८ मार्च रोजी महाशिवरात्री(Mahashivratri 2024 ) साजरी केली जाईल.

महाशिवरात्रीची पूजा सूर्योदयापासून दिवसभरात कधीही करता येते. परंतु धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष आणि निशित काळतील पूजा विशेष फलदायी मानली जाते.

वाचा | Lifestyle | स्वयंपाक घरातील ‘या’ 5 पदार्थांमुळे दात होतील पांढरे शुभ्र आणि किडण्यापासूनही होईल बचाव, लगेच पाहा

निशिता काळ मुहूर्त:

  • तारीख: ९ मार्च २०२४
  • वेळ: रात्री १२.०७ ते १२.५५

व्रत पारण मुहूर्त:

  • तारीख: ९ मार्च २०२४
  • वेळ: सकाळी ६.३७ ते दुपारी ३.२८

महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तीभावनेने भगवान शिवाची (Lord shiva) पूजा, अभिषेक, व्रत आणि जागरण केले जाते. या दिवशी शिवालयांमध्ये भक्तांची मोठी गर्दी उघडते.

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तामध्ये भगवान शिवाची पूजा करून आपण त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो.

Web Title | Mahashivratri 2024 | When is Mahashivratri; And know how to celebrate in detail…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button