ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Share Market | शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांची हवाचं! सेन्सेक्स आणि निफ्टीने मारली उंच उडी, जाणून घ्या सविस्तर…

आजच्या व्यवसायात भारतीय शेअर बाजार प्रचंड वेगाने पुढे जात आहेत.

Share Market | निफ्टी आणि सेन्सेक्स (Nifty and Sensex) प्री-ओपनिंगमध्येच मोठ्या उडी घेऊन व्यवहार करत आहेत. निफ्टी आज 16800 च्या जवळ सुरू होत आहे, जी या वर्तमान मालिकेतील सर्वोच्च पातळी असेल. शेकडो लोक आपली आर्थिक (Financial) परिस्थिती सुधारण्यासाठी शेअर मार्कटमध्ये गुंतवणूक (nvestment) करतात. चला तर मग आज शेअर मार्केटमध्ये (Share Market) काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊया.

शेअर मार्केट
शेअर मार्केटमध्ये आज BSE सेन्सेक्स 451.23 अंकांच्या किंवा 0.81 टक्क्यांच्या उसळीसह 56,267 वर उघडला. दुसरीकडे, NSE चा निफ्टी 133.05 अंकांच्या किंवा 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 16,774 वर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

वाचा: Bank Holidays | बँकांची कामे आत्ताच उरकून घ्या! ऑगस्टमध्ये 13 दिवस बँका राहणार बंद, वाचा सुट्ट्यांची यादी…

काय आहे निफ्टीची स्थिती?
निफ्टीची स्थिती आजच्या व्यवहारात निफ्टीच्या 50 पैकी 38 समभाग उसळी घेऊन व्यवहार करत आहेत. तर 12 शेअर घसरणीच्या लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. बँक निफ्टीतही मजबूत तेजीची नोंद होत आहे. बँक निफ्टीने 418 अंकांनी म्हणजेच 1.14 टक्क्यांनी वर राहून 37200 चा टप्पा पार केला आहे.

वाचाSubsidy | नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांच्या अनुदानासाठी काय आहेत पात्रता आणि अटी? जाणून घ्या सविस्तर…

क्षेत्रीय
निर्देशांकात आज बँक, वित्तीय आणि आयटी समभागांमध्ये जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. फार्मा, मीडिया, FMCG आणि हेल्थकेअर निर्देशांक घसरणीच्या लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. आज चढलेल्या क्षेत्रांमध्ये, आयटी समभाग 1.37 टक्के, वित्तीय समभाग 1.26 टक्के आणि बँक समभाग 1.12 टक्क्यांन, वाढले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button