ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Subsidy | नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांच्या अनुदानासाठी काय आहेत पात्रता आणि अटी? जाणून घ्या सविस्तर…

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.

Subsidy | या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आणि फायद्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीतील (Agriculture) नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत (Subsidy) देखील निर्णय घेण्यात आला आहे. या प्रोत्साहन अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) मदत मिळणार आहे. मात्र, या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी शर्तींची पूर्तता करावी लागेल. याच अटी आणि निकषांबाबत माहिती जाणून घेऊया.

कसे मिळणार अनुदान आणि काय बदल?
नियमित कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान (Subsidy) देण्यात येणार आहे. तसेच याच योजनेचा लाभ घेत असताना 2019 मध्ये राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील घेता येणार आहे. त्याचबरोबर एखादा शेतकरी मृत झाला असेल व त्याच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असेल, तर त्या वारसाला देखील या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

वाचा: आजचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय; जाणून घ्या शेतकरी ला नेमकं मिळालं ‘तरी काय

कधी मिळणार अनुदान?
फक्त पिक कर्ज नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान देईल जाईल. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नसेल तर त्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार नाही. पात्रतेच्या अटी निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. जवळपास 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी निधी लागेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे 5722 कोटी इतका खर्च येऊ शकतो.

वाचाCotton Bollworm | यंदा कपाशीचं उत्पादन जोरदार! केंद्रीय कापूस संस्था ‘हा’ भन्नाट उपक्रम राबवून बोंडअळीचा करणार नायनाट

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ
राज्य सरकारच्या योजनेंतर्गत राज्यातील कित्येक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 जून 2021 पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2018-19 मध्ये घेतलेल्या पीक कर्ज रकमेवर 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी 2018-19 मध्ये पीककर्ज घेतलेले आहे. पण ज्या शेतकऱ्यांची रक्कम ही 50 हजारापेक्षा कमी आहे. त्यांना कर्जाएवढ्या रकमेची मदत केली जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Incentive subsidy for regular loan repayment farmers know eligibility and conditions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button