ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

Eknath Shinde | राज्य सरकारचं शेतकऱ्यांना डबल धमाका गिफ्ट! मंत्रिमंडळात विजेच्या सवलतीपासून 50 हजारांच्या अनुदानापर्यंत घेतले निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी (27 डिसेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली.

Eknath Shinde | या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकित उपमुख्यमंत्र्यांनी 13 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तर राज्य सरकारकडून (Government) शेतकऱ्यांसाठी डबल धमाका स्वरूपाचे निर्णयाच मोठं गिफ्ट देण्यात आले आहे. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना शेतीतील (Agriculture) वीज बिलात सवलत देण्यात येणार आहे. तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत (Subsidy) देखील या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. चला तर या निर्णयांबाबत सविस्तर माहिती घेऊयात.

शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांच्या वीजबिलात एक रुपयाची कपात करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मध्यम व उच्चदाब प्रति युनिट मध्ये एक रुपयांची कपात केली जाणार आहे.

वाचा: Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेळीपालनासाठी 100 टक्के अनुदान, ‘या’ दोन योजनांना मंजुरी

50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान
एकनाथ शिंदे म्हणाले की, “जे शेतकरी नियमित कर्जफेड करत होते, त्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय़ घेण्यात आला. तसेच पूरस्थितीत मदतीसाठी जे शेतकरी वगळण्यात आले होते, त्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा 14 लाख शेतकऱ्यांनाचा फायदा होणार असून तिजोरीवर यामुळे 6 हजार कोटींचा भार पडणार आहे,” असे नमूद केले.

वाचा: E-Shram Card | ई-श्रम कार्ड योजनेसाठी 28 कोटी कामगारांची नोंदणी, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फायदा

राजकिय व सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे
राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये मार्च 2022 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

इत्तर मंत्रिमंडळ निर्णय बगण्यासाठी येथे क्लिक करा

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button