ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Stock Market | शेअर मार्केटमध्ये पैशांचा पाऊस! ‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ, तर सेन्सेक्स-निफ्टीलाही ग्रीन सिग्नल

शेअर मार्केट म्हणजे जिथे आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी (Stock market) किंवा विक्री करू शकता. एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी (Buy company shares) करणे म्हणजे त्या कंपनीच्या मालकीची काही टक्के रक्कम खरेदी करणे.

Stock Market | म्हणजेच आपण त्या कंपनीच्या टक्केवारीचे धारक होतो. जर ती कंपनी नफा कमावते, तर त्या नफ्यातील काही टक्के रक्कम आपल्यालाही दिली जाते. जर त्या कंपनीचे नुकसान झाले, तर त्या नुकसानाची टक्केवारीसुद्धा आपणालाच सहन करावी लागते. तर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी शेअर मार्केट तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स (Sensex) 433 अंकांनी म्हणजेच 0.82% वाढून 53,161.28 वर आणि निफ्टी (Nifty) 132.80 म्हणजेच 0.85% वाढून 15,832.05 वर बंद झाला आहे. सर्वाधिक वाढ आयटी शेअर्समध्ये (IT shares rise) झाली आहे. तर एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, सन फार्मा आणि इंडसइंड बँक 1-2% वाढले आहेत.

सोमवारी (27 जून) सेन्सेक्स 740 अंकांच्या वाढीसह 53,468 वर तर निफ्टी 227 अंकांच्या वाढीसह 15,926 वर उघडला. तर दुसरीकडे शुक्रवारी 78.34 प्रति डॉलरच्या बंदच्या तुलनेत रुपया 11 पैशांनी वाढून 78.23 प्रति डॉलरवर उघडला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील वाढ
बीएसईचे स्मॉलकॅप 188.65 किंवा 0.87% च्या वाढीसह 21,991.81 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप 384.01 किंवा 1.57% च्या वाढीसह 24,905.94 वर बंद झाला.

वाचा: Ration Card | केवळ 5 दिवसच बाकी! रेशन कार्ड त्वरित करा आधारशी लिंक, जाणून घ्या प्रक्रिया

सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये
वाढ NSE चे सर्व 11 क्षेत्रीय निर्देशांक तेजीत होते. आयटी निर्देशांकात 2.05% ची सर्वात मोठी वाढ झाली. तर मेटल इंडेक्स 1.52% वाढला. यानंतर बँक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, मेटल, प्रायव्हेट बँक आणि रियल्टी सेक्टर फार्मा आणि पीएसयू बँकेत किरकोळ वाढ झाली.

बजाज ऑटोने शेअर बायबॅकची केली घोषणा
बजाज ऑटोने 27 जून रोजी स्टॉक एक्सचेंजला कळवले की, कंपनीने शेअर बायबॅकला मान्यता दिली आहे. कंपनी बाजारातून 2500 कोटी रुपयांना शेअर्स खरेदी करणार आहे. दुचाकी कंपनी बजाज ऑटो 4,600 रुपये प्रति शेअर दराने 54.35 लाख शेअर्स खरेदी करण्याच्या तयारीत आहे. आज दुपारी 2.36 वाजता बजाज ऑटोचा शेअर अर्धा टक्का वाढून 3,840.90 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनी सध्याच्या शेअर किमतीपेक्षा 0.7% जास्त दराने शेअर बायबॅक करत आहे.

वाचा: Mahindra | शेतकऱ्यांच्या राणीची प्रतीक्षा संपली! नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनमध्ये शेतकऱ्यांसाठी बसवण्यात आलं ‘हे’ फिचर

टॉप गेनर कोण?
आजच्या टॉप गेनरबद्दल बोलायचे झाल्यास, LT चा स्टॉक 2.99 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर ठरला आहे. याशिवाय एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, टाटा स्टील, अल्ट्रा केमिकल, एसबीआय, आयटीसी, सन फार्मा, विप्रो, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, मारुती, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स. नेस्ले शेअर्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, डॉ रेड्डी, एचडीएफसी आणि बजाज फिनसर्व्ह ग्रीन सिग्नलमध्ये बंद झालेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button