ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

July Banks Holidays | बँकधारकांनो बँकेची कामे उरका! जुलैमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद, ताबडतोब तपासा यादी

बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हीही बँकधारक (Banker) असाल तर तुमच्यासाठी देखील ही बातमी महत्वाची ठरणार आहे.

July Bank Holidays | कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पुढच्या महिन्यातील म्हणजेच जुलै महिन्यातील सुट्ट्यांची (July bank holiday list) यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना लवकरात लवकर बँकांची कामे (Banks work) उरकून घ्यावी लागणार आहे. पुढील महिन्यात जुलैमध्ये रथयात्रा आणि बकरीदसारखे मोठे सण आहेत. त्यामुळे तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जुलै 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार पुढील महिन्यात 14 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.

सर्व राज्यांसाठी वेगवेगळे नियम
आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी साजरे होणाऱ्या सणांच्या अधिसूचनेवर देखील अवलंबून असतात. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. अशा परिस्थितीत जुलै महिन्यात बँकांचे कामकाज सुरळीत करण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहून नक्कीच बाहेर पडा, अन्यथा तुमचा दिवस वाया जाईल.

वाचा: Eknath Shinde | एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले आमदार कोण? जाणून घ्या यादी व शिवसेनेत उरलेले आमदार

वाचा: Uddhav Thackeray | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! बंडखोरांच्या खात्याचे फेरवाटप, जाणून घ्या राज्याचे नवे कृषी मंत्री कोण?

सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

  • 1 जुलै: कांग (रथयात्रा) / रथयात्रा भुवनेश्वर-इम्फाळ बँका बंद राहतील.
  • 3 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 5 जुलै: मंगळवार – गुरू हरगोविंद सिंग यांचा प्रकाश दिवस – जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद राहतील.
  • 7 जुलै: खारची पूजा – आगरतळ्यात बँका बंद राहतील.
  • 9 जुलै: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), ईद-उल-अजा (बक्रीद)
  • 10 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 11 जुलै: जम्मू आणि श्रीनगरमध्ये ईद-उल-अजा- बँका बंद राहतील.
  • 13 जुलै: भानू जयंती- गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.
  • 14 जुलै: बेन डिएनखलम – शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
  • 16 जुलै:हरेला-डेहराडूनमध्ये बँका बंद राहतील.
  • 17 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 23 जुलै: शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
  • 24 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 31 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button