ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याताज्या बातम्या

Uddhav Thackeray | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! बंडखोरांच्या खात्याचे फेरवाटप, जाणून घ्या राज्याचे नवे कृषी मंत्री कोण?

महाराष्ट्रातील सरकारात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्या गटातील बंडखोर आमदारांना आता ठाकरे सरकारने (Thackeray government) जोरदार धक्का दिलाय.

Uddhav Thackeray | आता ठाकरे सरकारने या बंडखोर आमदारांची खाती काडून घेत नवीन आमदारांना खात्यांचे फेरवाटप (Thackeray government Account rotation) केले आहे. बंडखोरांमुळे सर्वसामान्य जनतेचे अनेक कामे रखडली आहे. यामुळे ही कामे सुरळीत व्हावीत यासाठी ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय (Thackeray government big decision) घेतला आहे. मात्र, आता या निर्णयामुळे बंडखोरांना चांगलाच धक्का मिळाला आहे. चला तर मग नवीन सुधारित खातेवाटपात कोणते पद कोणत्या मंत्र्यांना देण्यात आले आहे ते जाणून घेऊयात.

ठाकरे सरकारने केले खातेवाटप:

शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती
• संजय बाबूराव बनसोडे- गृह ग्रामीण राज्यमंत्री
विश्वजित पतंगराव कदम- वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री
• सतेज उर्फ बंटी.डी. पाटील- राज्य उत्पादन शुल्क
• राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर- राज्यमंत्री खाती

वाचाEknath Shinde | एकनाथ शिंदेंसोबत सूरतहून ‘इतके’ आमदार गुहावटीत, मध्यरात्रीच का करण्यात आलं एअरलिफ्ट?

राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती
• विश्वजित पतंगराव कदम- सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री
• प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री – वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग
• सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री- अन्न व औषध प्रशासन
• आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री – सांस्कृतिक कार्य

अब्दुल नबी सत्तार राज्यमंत्री यांच्याकडील खाते
• प्राजक्त प्रसाद तनपुरे- राज्यमंत्री (महसूल)
• सतेज उर्फ बंटी डी. पाटील – राज्यमंत्री (ग्राम विकास)
• आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री – बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

वाचा: Eknath Shinde | एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले आमदार कोण? जाणून घ्या यादी व शिवसेनेत उरलेले आमदार

ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू राज्यमंत्री यांच्याकडील खाती
• आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण)
• सतेज उर्फ बंटी डी. पाटील – राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार)
• संजय बाबुराव बनसोडे – राज्यमंत्री (महिला व बाल विकास)
• दत्तात्रय विठोबा भरणे – राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

राज्याचे नवे कृषी मंत्री कोण?
बंडखोरांच्या गटात सामील होण्यापूर्वी राज्याचा कृषी विभागाचा कारभार दादाजी भुसे पाहत होते. मात्र ते शिंदे गटात सामील झाल्याने आता कृषी विभागाची कामे स्थगित आहेत. याचमुळे आता ठरले सरकारने दादाजी भुसे यांच्याकडील कृषी व माजी सैनिक कल्याण खाते व संदिपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर गडाब यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button