ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Mahindra | शेतकऱ्यांच्या राणीची प्रतीक्षा संपली! नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनमध्ये शेतकऱ्यांसाठी बसवण्यात आलं ‘हे’ फिचर

जगभर नावाजलेली महिंद्रा कंपनी या महिन्यात आपली सर्वात खास SUV Scorpio एका नवीन अवतारात सादर करणार आहे.

Mahindra | ही कार महिंद्रा स्कॉर्पिओ-एन (Mahindra Scorpio-N) आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर 27 जून रोजी या SUV ची किंमत जाहीर होणार आहे. लॉन्चपूर्वी (Mahindra Scorpio-N launch) तिचे अनावरण केले गेले आहे आणि त्याच्या अंतर्गत आणि बाह्य वैशिष्ट्यांचे तपशील उघड झाले आहेत. यासोबतच 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एनचे इंजिन (Mahindra Scorpio-N engine)आणि पॉवर तसेच ट्रान्समिशन पर्यायांशी संबंधित माहितीही समोर आली आहे. तुम्ही पण बघा नवीन महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये काय खास असेल. ही कार शेतकऱ्यांसाठी देखील फायद्याची आहे.

इंजिन
नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास ही SUV 3 इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाईल. याचे 2.2 लीटर डिझेल इंजिन 132hp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करेल. या इंजिन पर्यायासह स्कॉर्पिओ N 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) प्रणालीशी जोडले जाईल. यानंतर 2.2-लिटर डिझेल इंजिन देखील असेल. जे RWD तसेच 4WD प्रणालीसह सुसज्ज आहे. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 175hp पॉवर आणि 370Nm टॉर्क तसेच 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 400Nm टॉर्क जनरेट करेल. त्यानंतर, त्याचे 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 200hp पॉवर आणि 380Nm पर्यंत टॉर्क जनरेट करेल. या इंजिनसह 6MT आणि 6AT ट्रान्समिशन आणि RWD तसेच 4WD ड्राइव्ह पर्याय उपलब्ध असतील.

वाचा: Solar Powered Cars| काय सांगता? ना इंधनाची गरज ना चार्जिंगची तरीही धावणार ‘ही’ अनोखी कार, जाणून घ्या कंपनीचा नवा जुगाड आणि किंमत

पॉवरफुल लुक आणि फीचर्स
नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन मध्ये वाळू, माती, गवत आणि बर्फ सारख्या 4 ड्रायव्हिंग मोड्स देण्यात येतील. कारला समोर आणि मागे शक्तिशाली डिझाइन तसेच अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्टसह मोठी 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, लेदर सीट्स, पुश स्टार्ट/स्टॉप बटण, कनेक्ट केलेले कार तंत्रज्ञान मिळेल. वायरलेस चार्जिंग, सोनी ऑडिओ सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रिक सनरूफ, ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मल्टीपल एअरबॅग्ज आणि क्रूझ कंट्रोल यासह अनेक मानक आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये असतील. नव्या स्कॉर्पिओसोबतच जुनी स्कॉर्पिओही विक्रीसाठी उपलब्ध असेल. जी तुमच्यासाठी प्रचंड फायद्याची ठरेल.

वाचा: Mahindra | शेतकऱ्यांची राणी आली रे! महिंद्रा कंपनीने महिंद्रा स्कॉर्पिओ एन केली लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

शेतकऱ्यांसाठी महिंद्रा स्कॉर्पिओ-एन फायदेशीर
ही महिंद्रा स्कॉर्पिओ-एन शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरणार आहे. कारण ही कार तुम्ही कोठेही चालवू शकता. या कारच्या फीचरमध्ये शेतकऱ्यांसाठी एक खासियत आहे. ती म्हणजे नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनमध्ये वाळू, माती, गवत आणि बर्फ सारख्या 4 ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी शेतीतून कार नेताना या मोड्सचा वापर करू शकतील. तसेच पर्यटकांसाठी देखील कार विशेष कार्य करेल. कारण ही कार बर्फामध्ये देखील उत्तम चालणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button